advertisement

Marathwada Rain: ढगांची दाटी, पण पावसाची विश्रांती, मराठवाड्यात हवापालट, 1 ऑगस्टचा हवामान अंदाज

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात ऑगस्टच्या सुरुवातीलाच मोठे बदल जाणवत आहेत. 1 ऑगस्टचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
1/4
राज्यात मान्सूनचा जोर कमी झालेला दिसून येत असला तरी देखील काही ठिकाणी ढगाळ वातावरणात रिमझिम पाऊस पडत आहे. मराठवाड्यात देखील पावसाचा जोर कमी झाला आहे. आज 1 ऑगस्ट रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी ढगांचा गडगडाट सुद्धा होऊ शकतो. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

2/4
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये श्रावणधारा बरसण्याची शक्यता आहे. मात्र आज कोणत्याही जिल्ह्याला 'सतर्कतेचा आणि खबरदारीचा अलर्ट' हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेला नाही. हवामानात काही महत्त्वाचे बदल जाणवत असल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण तसेच रिमझिम पावसाची शक्‍यता आहे.

3/4
छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणारा असून हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट देखील होऊ शकतो. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात काही जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. आता मात्र पावसाने मराठवाड्यातून काढता पाय घेतला आहे.

4/4
पैठण येथील जायकवाडी धरणातून 9 हजार क्यूशेक वेगाने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. धरणाचे 27 मुख्य दरवाज्यातून सहाव्यांदा पाणी सोडण्यात आले आहे. यंदा जायकवाडी धरणात 90.24 टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीच्या काठावरील पैठण,पाटेगाव, आपेगाव, वडवाडीसह 18 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीपात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement