advertisement

Weather Alert: मराठवाड्यावर पुन्हा संकटाचे ढग, 48 तास पावसाचे, छ. संभाजीनगर, बीडसह 6 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. आज पुन्हा छत्रपती संभाजीनगरसह सहा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
1/5
बंगालच्या उपसागरातील 'मोंथा' चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाब प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. ऑक्टोबर अखेर पावसाचा जोर वाढला आहे. आज, मंगळवारी राज्यातील 29 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांचा समावेश असून पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

2/5
मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. ऑक्टोबर अखेर पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. आज छत्रपती संभाजीनगरसह 6 जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

3/5
छत्रपती संभाजीनगरसह बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत मंगळवारी जोरदार पावसाचा अंदाज आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने सतर्कतेचा यलो अलर्ट दिला आहे.

4/5
मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतून मात्र पावसाने काहीशी उघडीप घेतल्याचे चित्र आहे. आज या दोन्ही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु, सतर्कतेचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.

5/5
दरम्यान, मराठवाड्यात ऑक्टोबर अखेर पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. पुढली 48 तास हीच स्थिती राहणार आहे. त्यानंतर पुन्हा हवामानात मोठे बदल जाणवण्याची शक्यता असून पावसाची तीव्रता कमी होईल. मात्र, 48 तास नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement