Weather Alert: छ. संभाजीनगर ते बीड वारं फिरलं, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather update: मराठवाड्यातील हवामानत सातत्याने बदल जाणवत असून काही भागात गारठा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसभर आकाश निरभ्र राहणार असून हवा कोरडी असेल. शनिवारी कमाल तापमान 30.0 तर किमान 14.5 अंश सेल्सिअस इतकं राहील. दुसरीकडे जालना जिल्ह्यात दिवसाभर अंशतः ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमानात सुमारे दोन अंशांची घसरण होण्याची शक्यता आहे. तसेच येथे दिवसा तापमान 27.8 पर्यंत, तर रात्रीचे तापमान 15.0 राहील. त्यामुळे थंडीचा कडाका जालना पट्ट्यात स्पष्ट जाणवू शकतो.
advertisement
advertisement
हिंगोली आणि नांदेडमध्ये आकाश निरभ्र राहणार असलं तरी वाऱ्याचा वेग, हवा कोरडी असणं आणि काही ठिकाणी अंशत: ढगाळ हवामान यामुळे तापमानात घट होऊ शकते. सकाळ-संध्याकाळच्या वेळी थंडी अधिक जाणवेल. लातूरमध्ये देखील 6 डिसेंबर रोजी थंडी वाढण्याची शक्यता आहे. येथे कमाल तापमान 27.0 तर किमान 17.5 राहील. धाराशिव जिल्ह्यात आकाश काही प्रमाणात ढगाळ राहिल्याने रात्रीचा गारठा वाढण्याची शक्यता आहे.
advertisement








