Marathwada Rain: प्रतीक्षा संपली! विजांचा कडकडाट होणार, मराठवाड्यात पाऊस बरसणार, 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: गेल्या काही काळात मराठवाड्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. आज 4 जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
1/5
राज्यातील बहुतांश भागात मान्सूनची तीव्रता ओसरली आहे. मात्र, कोकण, घाटमाथ्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा जोर कायम आहे. मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना हवामान विभागाने पुन्हा यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह जालना, लातूर आणि बीड या जिल्ह्यांत पुढील 24 तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून 24 तासांसाठी यलो अलर्ट दिला आहे.

3/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये काही भागात शुक्रवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. आज पुन्हा हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. पुढील 24 तासांत जिल्ह्यात 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह आज जोरदार पावसाची शक्यता आहे.

4/5
मराठवाड्यातील परभणी, हिंगोली नांदेड आणि धाराशिवमध्ये आज तुरळक पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह तुरळक हलका पाऊस होऊ शकतो. मात्र, हवामान विभागाने या जिल्ह्यांना सतर्कतेचा कोणताही अलर्ट दिलेला नाही.

5/5
दरम्यान, मराठवाड्यात मागील पाच-सहा दिवसांपासून आकाश ढगाळ आहे. मात्र, तुरळक ठिकाणी हलक्या सरी वगळता कुठेही जोरदार पाऊस झालेला नाही. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या असून शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement