Marathwada Weather: मराठवाड्यात 24 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाचा 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. 13 जून रोजी मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
1/5
मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. गुरुवारी संभाजीनगर, जालना यासह मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली.

advertisement
2/5
जालन्यातील मंठ्यामध्ये वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर नांदेडमध्ये एक मुलगी पुराच्या पाण्यात वाहून गेली. 13 जून रोजी मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

3/5
बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या चार जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

4/5
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यात पाऊस सक्रिय झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. परंतु वादळी वाऱ्यामुळे व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांची सायंकाळच्या वेळी तारांबळ उडत आहे.

5/5
वादळी पावसात शेतकऱ्यांनी विजांपासून सावधानता बाळगावी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी पाऊस कोसळत असताना आणि विजांचा कडकडाट सुरू असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून होत असलेल्या दमदार पावसाने मराठवाड्यात खरीपाच्या पेरण्यांना देखील वेग आला आहे.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement