Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाची उघडीप, 24 तासांत बदलली हवा, हवामान विभागाकडून महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील काही दिवस मान्सूनची उघडीप राहणार आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
1/5
गेल्या काही दिवसांत राज्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली. आता मात्र पावसाचा जोर ओसरत आहे. मराठवाड्यात देखील पुढील काही काळ पावसासाठी वाट पाहावी लागणार आहे. आज मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांत पावसाची स्थिती कशी राहील? जाणून घेऊ.

advertisement
2/5
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना आज 10 जुलै रोजी कुठलाही सतर्कतेचा अलर्ट जारी केला नाही. गेल्या 24 तासांपूर्वी मात्र मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह 5 जिल्ह्यांना सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार काही ठिकाणी तुरळक हलका ते मध्यम पाऊस झाला.

3/5
आता मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. हवामान काही प्रमाणात ढगाळ राहणार असून तापमानात काहीशी वाढ जाणवणार आहे. पुढील काही दिवस मराठवाड्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र सतर्कतेचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.

4/5
पुढील 24 तासांत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तर परभणी, हिंगोली व नांदेडमध्ये जिल्ह्यात मध्यम पाऊस असणार आहे. तसेच लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात देखील एक दोन ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

5/5
मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाचे प्रमाण हे कमी असणार आहे. त्यामुळे खरीप पीके लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन योग्य ते नियोजन करावे. सध्या वातावरणात बदल जाणवत असल्याने पुढील काही काळ पाऊस मध्यम स्वरूपाचा असणार आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास खरीप पिकांना धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरू शकते.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement