Weather Alert: मराठवाड्यात 24 तासात हवापालट, हवामान विभागाकडून महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहे. पुढील 24 तासांसाठी 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
1/5
राज्यातील कोकण भागासह, पश्चिम महाराष्ट्रत मान्सूनचा जोर वाढत आहे. आज 9 जुलै रोजी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह 5 जिल्ह्यांना सतर्कतेचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या 5 जिल्ह्यांत सोसाट्याचा वारा अन् विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. या काळात तासी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील.

3/5
मराठवाड्यातील बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत एक दोन ठिकाणी हलका पाऊस होईल. मात्र या जिल्ह्यांना कोणताही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी चांगल्या पावसासाठी पुढील काही काळ वाटच पाहावी लागणार आहे.

4/5
गेल्या काही दिवसांपासून लातूर आणि धाराशिवमध्ये पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने खरीप पीके धोक्यात येण्याची संभावना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर बीडमध्ये मंगळवारी यलो अलर्ट होता. आज कोणताही अलर्ट नसला तरी काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

5/5
दरम्यान, मराठवाड्यातील पुन्हा मोठे बदल जाणवणार आहेत. 24 तासानंतर हवापालट होणार असून पावसाची तीव्रता आणखी कमी होणार आहे. 10 जुलैपासून पुढील काही दिवस हवामान विभागाने सतर्कतेचा कोणताही इशारा दिलेला नाही. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना आपल्या पिकांचे योग्य ते व्यवस्थापन करावं लागेल.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement