Marathwada Weather Update: छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात पावसाची शक्यता, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
Marathwada Weather Update: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 जानेवारीला सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील 2 दिवसांत थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 14 अंश सेल्सिअस असेल. जालन्यातही हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
advertisement
लातूर जिल्ह्यात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. कोरडे हवामान असल्याने शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे. धाराशिव जिल्ह्यात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 16 अंश सेल्सिअस असेल. या भागात पावसाचा अंदाज नसल्याने शेतकरी त्यांच्या शेतीच्या कामात व्यस्त राहतील.
advertisement
advertisement









