advertisement

gadchiroli : अशीही विषारी सूनबाई, सासू-सासऱ्यासह 5 जणांना विष देऊन मारलं, गडचिरोलीतील प्रकरणाची INSIDE STORY

Last Updated:
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातल्या महागाव बुद्रुक या गावात कुंभारे कुटुंबातील पाच जणांचा पंधरा दिवसात मृत्यू झाल्याने या प्रकरणातील गुढ वाढले होते. एकाच कुटुंबातील आई -वडील, मुलगा- मुलगी आणि मावशी असे पंधरा दिवसांच्या कालावधीत मृत्युमुखी पडल्याच प्रकरणाची गडचिरोली पोलिसांनी केलेल्या चौकशीत विष देऊन हत्या करण्यात आल्याचं उघड झालं असून या पाच ही जणांच्या मृत्यूची मास्टर माईंड त्यांच्या घरतल्या सूनेसह दोन महिला मुख्य आरोपी असल्याचं स्पष्ट झालंय. (महेश तिवारी, प्रतिनिधी)
1/9
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातल्या महागाव बुद्रुक या गावात कुंभारे कुटुंबातील पाच जणांचा पंधरा दिवसात मृत्यू झाल्याने या प्रकरणातील गुढ वाढले होते. एकाच कुटुंबातील आई -वडील, मुलगा- मुलगी आणि मावशी असे पंधरा दिवसांच्या कालावधीत मृत्युमुखी पडल्याच प्रकरणाची गडचिरोली पोलिसांनी केलेल्या चौकशीत विष देऊन हत्या करण्यात आल्याचं उघड झाल असून या पाच ही जणांच्या मृत्यूची मास्टर माईंड त्यांच्या घरतल्या सूनेसह दोन महिला मुख्य आरोपी असल्याचं स्पष्ट झालंय.

2/9
महागाव येथील 22 सप्टेंबर रोजी या कुटुंबातील विजया या 43 वर्षीय महिला डोकेदुखी व थकव्यामुळे आजारी पडल्या. त्यांचे पती शंकर त्यांना कारद्वारे रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन चंद्रपूरला नंतर नागपूरला गेले. मात्र तेही आजारी पडले. 26 सप्टेंबर रोजी रात्री शंकर कुंभारे तर 27 सप्टेंबर रोजी सकाळी विजया यांचा मृत्यू झाला. दरम्यान अंत्यविधीसाठी आलेली विवाहित कन्या कोमल माहेरी आली होती. तिचाही 08 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. तर सिरोचा येथे पोस्टमन म्हणून कार्यरत असलेला त्यांचा मुलगा रोशन कुंभारे याचाही नागपुरात उपचार सुरू असताना 15 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला.रोशनच्या आई वडिलांच्या अंत्यविधीसाठी महागाव येथे आलेल्या या कुटुंबातील मावशी आनंदा उराडे यांचाही 14 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता.

3/9
आई वडील उपचारकामी रुग्णालयात भरती असल्याची माहिती मिळताच शंकर कुंभारे यांचा दिल्ली इथं नोकरी निमित्य वास्तव्यास असलेला मोठा मुलगा सागर कुंभारे हा चंद्रपूर येथे आला असता, आई वडिलांच्या मृत्यूनंतर तो दिल्ली येथे परत गेल्यावर अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने त्यास उपचारकामी दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याचप्रमाणे शंकर कुंभारे आणि विजया कुंभारे यांना अहेरी येथून चंद्रपूर इथं उपचारकामी नेणारा त्यांच्या कारचा चालक राकेश मडावी याची देखील दुस­या दिवशीपासून प्रकृती बिघडल्याने त्याला देखील चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारकामी भरती करण्यात आले.

4/9
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कसून चौकशी करण्याचे निर्देश दिले त्यात या गुढ मृत्यू प्रकरणाचा उलगडा झाला. प्रेम विवाह करून घरात आलेली सून संघमित्रा कुंभारेचं घरात सासू सासऱ्यासोबत वाद व्हायचा तसंच दुसरी आरोपी रोजा रामटेके हीचा संपत्तीच्या हिस्स्यातून वाद होता. अखेर या दोघींनी तेलंगणातून विष आणलं. मृतकाच्या आणि आजारी व्यक्तींच्या जेवणात खाण्यास दिले त्या विषाचा परिणाम हळूहळू होऊन सर्व व्यक्ती एकापाठोपाठ आजारी पडून पाचही जणाचा मृत्यू झाला. पोलिसांच्या चौकशीत या दोघींनी गुन्हा कबुल केला आहे.

5/9
सर्वात आधी 20/09/2023 रोजी शंकर कुंभारे आणि त्यांची पत्नी विजया कुंभारे यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना अहेरी व त्यानंतर चंद्रपूर व शेवटी नागपूर येथील नामांकित रुग्णालयात उपचारकामी भरती करण्यात आले. परंतु दिनांक 26/09/2023 रोजी शंकर कुंभारे आणि दिनांक 27/09/2023 रोजी त्यांच्या पत्नी सौ. विजया कुंभारे यांचा लागोपाठ दिवसात मृत्यू झाला. त्या धक्यातून सावरत असताना अचानक त्यांची गडअहेरी इथं राहणारी त्यांची मुलगी कोमल दहागावकर आणि मुलगा रोशन कुंभारे यांची तसंच शंकर कुंभारे यांची मुल इथं राहणारी साली आनंदा ऊर्फ वर्षा उराडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आले. अनेक औषध उपचार करुन देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न होता दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यामध्ये दिनांक 08/10/2023 रोजी कोमल दहागावकर दिनांक 14/10/2023 आनंदा ऊर्फ वर्षा उराडे आणि दिनांक 15/10/2023 रोजी रोशन कुंभारे याचा मृत्यू झाला.

6/9
मृत्यू पावलेल्या पाच व्यक्ती आणि सध्या उपचार घेत असलेल्या तीन व्यक्तींमध्ये हातापायाला मुंग्या येणे, कंबरेखालील भागामध्ये आणि डोक्यामध्ये प्रचंड वेदना, ओठ काळे पडून जीभ जड पडणे यासारखे एकसमान लक्षणे दिसून आली. सदर लक्षणावरुन मृत आणि आजारी व्यक्तींना कुठलीतरी विष बाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकारी यांनी वर्तवला. परंतू त्यांच्या करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीमध्ये ते विषाबाबत अधिक निश्चीत माहिती निष्पन्न झाली नाही. एकाच परिवारातील पाच व्यक्तींच्या अल्पावधीत झालेल्या गुढ मृत्युमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरुन भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर घटनेबद्दल पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी अत्यंत गांभिर्याने घेवून अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पोस्टे अहेरीचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांदे आणि स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी आणि त्यांच्या तपास पथकास सदर गुन्हा उघडकीस आणण्याची जबाबदारी सोपविली.

7/9
 महिला आरोपी संघमित्रा कुंभारे हिने रोशन कुंभारे याचेशी तिच्या आई वडिलांच्या विरोधात जावून लग्न केले. या कारणामुळे तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. तसंच याबाबत पती रोशन आणि सासरचे मंडळी तिच्या माहेरच्या लोकांच्या नावे वारंवार टोमणे मारत असत, तसंच सह आरोपी रोझा रामटेके हिने तिच्या सास­ऱ्यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीत शंकर कुंभारे यांची पत्नी विजया कुंभारे आणि तिच्या इतर बहिणी हिस्सा मागून नेहमी वाद करित असल्याच्या कारणावरुन त्या दोघींनी संपूर्ण कुंभारे परिवार आणि त्यांचे नातलागांना विष देवून जिवे ठार मारण्याची योजना आखली.

8/9
त्या योजनेप्रमाणे रोझा रामटेके हिने तेलंगणा राज्यात जावुन विष आणले. ते विष जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या दोघींनी मृतकांच्या आणि आजारी व्यक्तींच्या खाण्यापिण्याच्या वस्तुंमध्ये मिसळुन त्यांना खाण्यास दिल्याने त्या विषाचा हळुहळु परिणाम होवून त्या सर्व व्यक्ती एका पाठोपाठ आजारी पडण्यास सुरुवात झाली. त्यात पाच व्यक्तींचा मृत्यू झाला. राकेश मडावी हा शंकर कुंभारे यांचे परिवारातील नव्हता. परंतू तो त्यांच्या गाडीतील पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमधील पाणी पिल्याने विषबाधा होवून तो आजारी पडला.

9/9
सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन अहेरी येथे अप क्र. 374/2023 कलम 302, 307, 328, 120 (ब) व 34 भादवि अन्वये गुन्हा नोंद करुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी सुदर्शन राठोड हे करित असून सदर गुन्ह्रातील दोन्ही महिला आरोपी यांना आज दिनांक 18/10/2023 चे 09:52 वा. अटक करण्यात आली. तसंच सदर गुन्ह्रात इतर आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. सदर गुन्हा उघडकिस आणण्याकरीता पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अहेरी आणि स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील अधिकारी आणि अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement