दुष्काळामुळं गाव सोडला, आता 40 लाखांचा बंगला बांधला, घरावरचा JCB सांगतोय संघर्ष कहाणी!

Last Updated:
जेसीबी ऑपरेटर म्हणून काम केलेल्या हनुमंत बारस्कर यांनी 40 लाखांचा बंगला बांधला. या बंगल्यावर चक्क जेसीबीची प्रतिकृती बनवली आहे.
1/7
प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो आणि या संघर्षातून मिळालेलं यशही खास असतं. आज अशाच एका व्यक्तीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. या व्यक्तीचा जवळपास 40 लाख रुपयांचा बंगला आहे आणि या बंगल्यावर त्यांनी जेसीबीची भव्य प्रतिकृती तयार केलीय.

advertisement
2/7
 40 लाखांच्या बंगल्यावर बनवलेला हा जेसीबी जणू मालकाची संघर्षगाथाच सांगतो.  जेसीबी ऑपरेटर म्हणून काम केलेल्या हनुमंत बारस्कर यांनी हा बंगला बांधला आहे. परंडा तालुक्यातील पाच पिंपळा हे त्यांचं गाव असून ते शेतकरी कुटुंबातील आहेत.
40 लाखांच्या बंगल्यावर बनवलेला हा जेसीबी जणू मालकाची संघर्षगाथाच सांगतो. धाराशिवमधील जेसीबी ऑपरेटर म्हणून काम केलेल्या हनुमंत बारस्कर यांनी हा बंगला बांधला आहे. परंडा तालुक्यातील पाच पिंपळा हे त्यांचं गाव असून ते शेतकरी कुटुंबातील आहेत.
advertisement
3/7
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ म्हणजे शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजला आहे. दुष्काळ आणि नापीकेला कंटाळुन हनुमंत बारस्कर यांचे आई वडील बारामतीला कामाला गेले. त्या ठिकाणी हनुमंत बारस्कर यांनी जेसीबी चालवण्याचा प्रशिक्षण घेतलं आणि जेसीबी ऑपरेटर म्हणून कामाला सुरुवात केली.

4/7
सुरुवातीला त्यांना 700 रुपये महिना पगार मिळाला. त्यानंतर पगार वाढत गेला. त्याठिकाणी त्यांनी 4 वर्षे ऑपरेटर म्हणून काम केले आणि ते गावाकडे आले. त्यानंतर त्यांनी कमिशनवर जेसीबी मशीन चालवण्यास घेतले.

5/7
कमीशनवर जेसीबी चालवून काही पैसे जमा झाल्यानंतर त्यांनी स्वतःची जेसीबी मशीन विकत घेतली. यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळू लागलं. आता वर्षाकाठी त्यांना 3 ते 4 लाख रुपयांची कमाई होतेय. त्यामुळे त्यांनी 40 लाखांचा बंगला बांधला.

6/7
जेसीबी ऑपरेटर म्हणून काम केलेल्या हनुमंत यांनी चक्क घरावर जेसीबीची प्रतिकृती बनवली आहे. ही प्रतिकृती आरसीसी बांधकामाची असून यामध्ये त्यांनी पाण्याची टाकी देखील बनवली आहे. त्या प्रतिकृतीमध्ये 2 ते अडीच हजार लीटर पाणी बसते.

7/7
बारस्कर हे आता आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. त्यांनी आपल्या शेतात डाळिंब, पेरू यासारख्या फळबागांची लागवड केली. त्यातूनही त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न देखील मिळते आहे. दिमाखात बंगल्यावर असलेला हा जेसीबी हनुमंत बारस्कर यांचा संघर्ष भल्या मोठा अभिमानाने सांगतो, असे दिसून येते. (उदय साबळे, प्रतिनिधी)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement