आधी बांधला 80 लाख रुपयांचा बंगला अन् मग त्यावर ठेवला ट्रॅक्टर, धाराशिवमधील मेकॅनिकची अनोखी गोष्ट!

Last Updated:
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून एका व्यक्तीने मोठ्या कष्टानं आपल्या कुटुंबियांसाठी सुखाचे दिवस आणले. आज महिन्याकाठी त्यांची उलाढाल जवळपास दीड लाख रुपयांची आहे. आज जाणून घेऊयात त्यांची यशस्वी कहाणी. (उदय साबळे/धाराशिव, प्रतिनिधी)
1/7
एक दिवस आपणही मोठं घर घ्यायचे. एक दिवस आपणही मोठा बंगला बांधायचा, असं स्वप्न अनेक जणांनी उराशी बाळगलेलं असतं आणि त्यासाठी जर मेहनत आणि कष्ट केले, संयम ठेवला तर स्वप्न नक्की पूर्ण होते. अशोक भिलारे हे यापैकी एक.

advertisement
2/7
कधीकाळी साधा मेकॅनिक म्हणून हातावर पोट अशी त्यांची परिस्थिती होती. मात्र, हार न मानता प्रामाणिकपणे काम करत राहिल्यामुळे आज त्यांनी तब्बल 80 लाख रुपयांचा बंगला बांधला आहे. या बंगल्यालाही त्यांनी असा टच दिलाय की, आपली सुरूवात कुठून झाली याचा विसर त्यांना कधीच पडणार नाही.

3/7
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्याच्या अनाळाचे रहिवासी अशोक भिलारे. व्यवसायानं ते ट्रॅक्टर मेकॅनिक. मूळ परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील त्यांचं कुटुंब. मात्र, ते अनाळा येथे स्थायिक झाले. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.

4/7
घर सांभाळण्यासाठीच त्यांनी ट्रॅक्टर दुरुस्तीचं प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अनाळा येथे ट्रॅक्टर दुरुस्तीचं एक लहान गॅरेज सुरू केलं. हळूहळू त्यांच्या व्यवसायाची भरभराट होत गेली.

5/7
बंडेवार ट्रॅक्टर धाराशिव यांनी ट्रॅक्टर विक्रीचं आणि दुरुस्तीचं काम भिलारे यांना दिलं. त्यामुळे त्यांची प्रगती होतच गेली. अशाप्रकारे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून भिलारे यांनी मोठ्या कष्टानं आपल्या कुटुंबियांसाठी सुखाचे दिवस आणले.

6/7
आज त्यांनी तब्बल 80 लाख रुपयांचा बंगला बांधला आहे आणि त्यांचे ट्रॅक्टर प्रेम एवढे आहे की, या बंगल्यावर क्रेनच्या सहाय्याने त्यांनी खराखुरा ट्रॅक्टर ठेवला आहे. हा ट्रॅक्टर आता लोक बघतच बसतात.

7/7
भिलारे दररोज सकाळी 15 मिनिटं हा ट्रॅक्टर सुरू करतात. त्याची पूजा करतात आणि मगच पुढच्या कामाला सुरूवात करतात. आता त्यांच्या गॅरेजमध्ये 8 कामगार आहेत. शिवाय महिन्याकाठी त्यांची जवळपास दीड लाख रुपयांची उलाढाल होते. ज्या कामाच्या जोरावर त्यांना ऐश्वर्य प्राप्त झालं त्या ट्रॅक्टरला त्यांनी आपल्या लाखोंच्या घरात सर्वात टॉपचं स्थान दिले आहे, हे उल्लेखनीय आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement