धुळे: प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात, अंगावर काटा आणणारे घटनास्थळावरचे फोटो

Last Updated:
धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील दबाशी फाट्याजवळ आज सकाळी लालपरीचा भीषण अपघात झाला. शिरपूरहून शिंदखेड्याकडे जाणाऱ्या एसटी बसला एका ट्रकने धडक दिल्याने हा अपघात घडला.
1/6
धुळे, महाराष्ट्र: जिथे ट्रेन पोहोचू शकली नाही अशा आडगावातही आजही लालपरी पोहोचते. या लालपरीनं नागरिकांचं आयुष्य थोडं सुखकर अन् सुरळीत झालं आहे. या लालपरीची अवस्था ग्रामीण भागात फार वाईट आहे. एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एसटीचे दोन तुकडे होता होता राहिले.

advertisement
2/6
धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील दबाशी फाट्याजवळ आज सकाळी लालपरीचा भीषण अपघात झाला. शिरपूरहून शिंदखेड्याकडे जाणाऱ्या एसटी बसला एका ट्रकने धडक दिल्याने हा अपघात घडला.
धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील दबाशी फाट्याजवळ आज सकाळी लालपरीचा भीषण अपघात झाला. शिरपूरहून शिंदखेड्याकडे जाणाऱ्या एसटी बसला एका ट्रकने धडक दिल्याने हा अपघात घडला.
advertisement
3/6
या अपघातात बसमधील आठ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, इतर 30 ते 35 प्रवाशांना दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर - शिंदखेडा एसटी बस दबाशी फाट्याजवळून जात असताना एका भरधाव ट्रकने बसला मधोमध धडक दिली.

4/6
धडक इतकी जोरदार होती की बसचे मोठं नुकसान झालं. अपघातानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. स्थानिकांनी देखील गाड्या थांबवून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.  अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आलं आहे.

5/6
काही रुग्णांना धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींवर सखोल उपचार सुरू असून, इतरांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

6/6
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या अपघातात एसटीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement