Dhule Accident : मद्यधुंद चालकानं दिली धडक, किर्तन करून परतणाऱ्या 5 जणांचा मृत्यू, घटनास्थळी काळजाचा थरकाप उडवणारं दृश्य

Last Updated:
Dhule Shindkheda Accident :धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच प्राण गेला तर चौघांची प्रकृती गंभीर आहे.
1/5
पिकअप आणि इको कारमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचे जागीच प्राण गेले तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मयतांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती कळते आहे.

advertisement
2/5
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. पिकअप व्हॅन आणि इको गाडीत झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

3/5
कीर्तनाचा कार्यक्रम आटपून घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला. हे सर्व शिंदखेडा शहरातील रहिवासी असून ते कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी वारूळ पाष्टे गावाला गेले होते.

4/5
दरम्यान कीर्तनाचा कार्यक्रम आटपून घरी परतत असताना नरडाणा शिंदखेडा रस्त्यावरील दसवेल फाट्याजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकप यांनी जोरदार धडक दिली.

5/5
धडक इतकी मोठी होती की इको वाहनाचा अक्षरशः  चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून यात तीन महिलांचा समावेश आहे. दरम्यान पिकअप व्हॅन चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement