10 कोटीच्या पुलाला लाकडाचा आधार; जीवघेण्या प्रवासा विरोधात गावकरी एकवटले PHOTOS
- Published by:News18 Marathi
Last Updated:
होड्री नदीवर 10 कोटी रुपये खर्चून बेली पूल बांधला पण त्याचे काम अपूर्णच असून त्याला लाकडाचा आधार आहे. त्यावरूनच येथील नागरिक जीवघेणा प्रवास करत आहेत.
राज्यात ऐकीकडे शासन आपल्या दारी या उपक्रमातून सरकार नागरिकांच्या दारी जाऊ पाहत आहे. तर दुसरीकडे नागरिकांना त्याच्याच दारी पोहचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या अगदी टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यातील दुर्गम अशा होड्री आणि तेथील आसपासच्या गावांची ही स्थिती आहे. होड्री नदीवर 10 कोटी रुपये खर्चून बेली पूल बांधला पण त्याचे काम अपूर्णच असून त्याला लाकडाचा आधार आहे. त्यावरूनच येथील नागरिक जीवघेणा प्रवास करत आहेत.
advertisement
advertisement
महाराष्ट्र छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या होडरी गावाच्या वेशिवरून होड्री ही नदी वाहते. पावसाळ्यात या नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ होते. त्यामुळे इथून पुढे अनेक गावांचा संपर्क तुटतो. म्हणून अनेक वर्षापासूनच्या मागणी नंतर गेल्या तीन वर्षांपूर्वी शासनाने या नदीवर सुमारे 10 कोटी रुपये खर्ची करून कोलकाता येथील हावडा पुलासारखा बेली पूल बांधण्यास सुरुवात केली. तसे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने खाजगी कंपनीला दिले.
advertisement
सरकारी काम आणि 12 महिने थांब ही म्हण गडचिरोलीतील या पुलाबाबत चुकीची ठरली असून सरकारी काम आणि वर्षोनवर्ष थांब हेच वास्तव असल्याची भावना येथील लोकांची झालीय. कित्येक वर्षांच्या मागणीनंतर आज हा पूल तयार असला तरी पुलाच्या उतरणीला काँक्रिटचा रस्ता बांधलाच नाही. त्यामुळे उंचावरील पुलावरून रस्त्यावर उतरण्यासाठी लोकांनी लाकडाची शिडी केलीय. या लाकडी रॅम्पवरून जीव मुठीत घेऊन नागरिक येजा करतात.
advertisement
advertisement