health tips in marathi : रात्री झोपण्यापूर्वी अजिबातच हे पदार्थ खाऊ नयेत, डॉक्टरांचं ऐकायला हवं
- Reported by:Kale Narayan
- local18
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
बदलत्या जीवन पद्धतीनुसार आपल्या खानपानाच्या पद्धतीमध्येही बरेच बदल झाले आहेत. हल्ली जेवणानंतर वेगवेगळी पेय खाद्यपदार्थ तसेच गोड पदार्थ खाण्याचा ट्रेंड वाढत आहे. यामध्ये आईस्क्रीम, मिल्क शेक, दूध, कॉफी इत्यादी खाद्यपदार्थ आणि पेय यांचा समावेश होतो. मात्र, हे खाद्यपदार्थ आपल्या चयापचय क्रियेवर परिणाम करतात. (नारायण काळे/जालना, प्रतिनिधी)
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, आपल्या सर्वांना आहार आणि इन्सुलिन याचा संबंध आहे हे माहीत असेलच. सकाळी उठल्यानंतर इन्सुलिनचं सिक्रेशन सुरू होते. दुपारच्या वेळी इन्सुलिन सिक्रेशन सगळ्यात जास्त पातळीवर असते तर सायंकाळी आणि रात्री ते सर्वात कमी असते. यामुळे रात्री सात वाजेच्या आसपास आपण रात्रीचे जेवण करायला हवे.
advertisement
बरेच जण रात्री जेवण लवकर करतात. मात्र, टीव्ही, मोबाईल पाहण्यात व्यस्त असल्याने जेवणानंतर आईस्क्रीम, मिल्क शेक, शुगर कँडी असे पदार्थ घेतात त्याचबरोबर रात्री दूध घेणारेही अनेक जण आहेत. असे गोड खाद्यपदार्थ जेवणानंतर घेतल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे निद्रानाश होण्याची शक्यता असते असे कुलकर्णी यांनी सांगितले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







