जालन्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक घरांची पत्रे उडाली, घटनास्थळाचे धक्कादायक PHOTOS
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
नैऋत्य मान्सून ने राज्यात जोरदार धडक दिल्यानंतर राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. मुंबई पुणे, कोल्हापूर इत्यादी ठिकाणीही मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. तर मराठवाड्यामध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबादमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जाफराबाद तालुक्यातील वडाळा येथील घरे वादळाच्या तडाख्यात सापडल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. (नारायण काळे/प्रतिनिधी, जालना)
advertisement
advertisement
advertisement