4 फुटांच्या बेडवर लावली ज्वारी; टपोरे दाणे आणि भरगच्च कणीस करणार मालामाल
- Published by:News18 Marathi
Last Updated:
निसर्गाचा असमतोल, बाजारभावाची गणितं आणि पिकाला मिळणारा अत्यल्प दर यातूनच मार्ग काढत अनेक शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत.
advertisement
advertisement
अशोक पांढरे हे जालना जिल्ह्यातील काजळा या छोट्याशा गावातील सामान्य शेतकरी आहेत. घरी शेती कमी असल्याने ते वेगवेगळे प्रयोग शेतीमध्ये करत असतात. तुर्की इथून आणलेल्या बाजरीमुळे देखील अशोक पांढरे चर्चेत आले होते. त्याचबरोबर बेडवर केलेल्या सोयाबीन लागवडीतून देखील त्यांनी भरपूर उत्पन्न मिळवले. आता त्यांनी ज्वारीच्या शेतीत अनोखा प्रयोग केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
मोबाईल चाळत असताना युट्युब वर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शेतकऱ्याला दीड एकरात साठ गोण्या ज्वारी झाल्याचं पाहिलं. लगेच तिथे दिलेल्या मोबाईल नंबर वर कॉल केला. शेतकऱ्याने बियाणे उपलब्ध असल्याचे सांगितलं. त्या शेतकऱ्यांनी दोन-तीन वर्षांमध्ये निवडक कणसे जमा करून बियाणे तयार केल्याचं सांगितलं. चार फुटांच्या बेडवर ठिबक अंथरून या ज्वारीची लागवड केली. खत आणि पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे ज्वारीचे पीक चांगलं बहरात आलं असून भरघोस उत्पन्न मिळेल, असं पांढरे यांनी सांगितलं.


