advertisement

Ladki Bahin Yojana: तुमच्या घरात चारचाकी आहे का? अंगणवाडी सेविका येणार घरी, काय तपासणार?

Last Updated:
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता अंगणवाडी सेविका घरोघरी येऊन तपासणी करणार आहेत.
1/5
राज्यात विधानसभा निवडणूकीच्या आधीपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यातील कमी उत्पन्न गटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. नुकतेच मार्च महिन्यात सराकारकडून 2 महिन्यांचे 3 हजार रुपये खात्यांवर जमा करण्यात आले.

2/5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही कमी उत्पन्न गटातील महिलांसाठी आहे. परंतु, अनेक महिला या योजनेच्या अटी व शर्तींना डावलून या योजनेचा लाभ घेतल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी होणार आहे.

3/5
लाडक्या बहिणींच्या अर्जांची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. शेती, शासकीय नोकरी किंवा अडीच लाख रुपये उत्पन्न असमाऱ्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे. तसेच चारचाकी गाडी असणाऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.

4/5
कुटुंबातील सदस्याकडे कार असल्यास किंवा 5 एकर पेक्षा अधिक शेतजमीन असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. लवकरच आरटीओ कडून एक यादी महिला व बाल कल्याण विभागाकडे देण्यात येणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी देखील सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

5/5
ज्या महिलांचे उत्पन्न जास्त आहे, अशा लाभार्थ्यांनी योजनेतून माघार घ्यावी, असे आवाहन राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तर काही ठिकाणी महिलांनी योजनेतून माघार घेण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकाडे अर्ज देखील दाखल केले आहेत.

मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement