पतीचं निधन अन् कुटुंबाची जबाबदारी, अंबाबाई मंदिराजवळ आप्पे विकून 'ती'नं बांधलं घर
- Published by:News18 Marathi
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
पतीच्या अकाली निधनानंतर 2007 साली मंगल पाटील यांनी अंबाबाई मंदिर परिसरात आप्पे, इडली, डोसा, उत्ताप्पा असे पदार्थ बनवून विकण्यास सुरुवात केली.
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे वर्षाचे 365 दिवस भाविकांनी गजबजलेलं असतं. त्यामुळे या परिसरात बऱ्याच महिला व्यावसायिका नाष्ट्याचे स्टॉल लावून त्यावर आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. यापैकीच एक मंगल पाटील या आहेत. गेली जवळपास 17 वर्षे त्या त्यांचा साऊथ इंडियन पदार्थांचा स्टॉल लावत आहेत. याच स्टॉलमुळे घरची परिस्थिती सुधारण्यास खूप फायदा झाल्याचे त्या सांगतात.
advertisement
खरंतर मंगल पाटील या आपल्या पतीसह सुखी संसार करत होत्या. मात्र पतीच्या निधनानंतर त्या त्यांचा मुख्य आधार गमावून बसल्या. मात्र मुलाबाळासाठी त्यांनी धीर सोडला नाही. त्यातूनच 2007 साली त्यांनी अंबाबाई मंदिर परिसरात आप्पे, इडली, डोसा, उत्ताप्पा असे पदार्थ बनवून विकण्यास सुरुवात केली. रोज पहाटे येऊन त्या हा स्टॉल लावत असत. रोज सकाळ आणि संध्याकाळी हा स्टॉल लावत असल्याचे त्या सांगतात.
advertisement
advertisement
त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर पदार्थ बनवण्याचा अनुभव होता. म्हणूनच त्यांनी हा नाष्ट्यचा स्टॉल लावण्यास सुरुवात केली. सुरवातीला त्या शिरा, उपमा, पोहे असे पदार्थ बनवत असत. मात्र अंबाबाई मंदिर परिसरात येणाऱ्या दक्षिणेकडील भाविकांच्या संख्येमुळे त्यांनी दाक्षिणात्य पदार्थ विकण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांना त्यांच्या मुलींनीही मदत केल्याचे मंगल सांगतात.
advertisement
advertisement
advertisement