बारामती, इंदापुरात कोण जिंकणार? आबांचा लेक विधानसभेत प्रवेश करणार? न्यूज १८ च्या पत्रकारांचा अंदाज
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Maharashtra Vidhan Sabha Results Prediction: राज्यातल्या २८८ मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली असून उद्या २३ नोव्हेंबर रोजी येणाऱ्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागलं आहे.
पवार विरुद्ध पवार तसेच काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होत असल्याने बारामती विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार सातव्यांदा बारामतीचे प्रतिनिधित्व करणार की युगेंद्र पवार विधानसभेत पाऊल ठेवणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. न्यूज १८ लोकमतच्या पत्रकारांच्या पोलमध्ये अजित पवार यांना बारामतीमधील परिस्थिती अनुकूल असल्याचे सांगण्यात आले आहे. युगेंद्र पवार यांच्यासाठी बारामतीमधील परिस्थिती प्रतिकूल असल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
advertisement
कवठे महंकाळ विधानसभा : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील विरुद्ध त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी संजय काका पाटील यांच्यात तगडी फाईट होत आहे. कवठे महंकाळ विधानसभेत रोहित पाटील यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती असेल, असा अंदाज न्यूज १८ लोकमतच्या पत्रकारांच्या पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे.
advertisement
सांगोला विधानसभा : काय झाडी काय डोंगर अशा डायलॉगने लोकप्रिय झालेले आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सांगोल्यात काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. शहाजी बापू विरुद्ध ठाकरे सेनेचे दीपक आबा साळुंखे विरुद्ध अपक्ष बाबासाहेब देशमुख यांच्यातील लढतीत १८ लोकमतच्या पत्रकारांच्या पोलमध्ये ठाकरे सेनेचे दीपक आबा साळुंखे यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती असेल, असे सांगण्यात येत आहे.
advertisement
advertisement
पाटण विधानसभा : मावळत्या शिंदे सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटणकडेही सातारा जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेले आहे. शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजीत पाटणकर-हर्षल कदम अशा लढतीत शंभूराज देसाई यांना अनुकूल परिस्थिती असेल, असा अंदाज न्यूज १८ लोकमतच्या पत्रकारांच्या पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे.
advertisement