Rain Alert: नागपूरसाठी धोक्याचा इशारा, विदर्भात बरसणार धो-धो! 11 जिल्ह्यांना अलर्ट, आजचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Vidarbha Weather: विदर्भासह राज्यात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज पुन्हा नागपूरसह 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने अनेक भागात हजेरी लावली आहे. आज 23 मे रोजीही विदर्भात ढगाळ हवामान राहणार असून, वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तापमानात काहीशी घसरण झाली असून, उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, बुलढाणा आणि इतर जिल्ह्यांमध्ये आज कमाल तापमान 35 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान असू शकतं. त्याचबरोबर आकाश ढगाळ राहणार असून, विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement