Vidarbha Rain Alert : सोसाट्याचा वारा अन् विजांचा कडकडाट, विदर्भासाठी पुढचे चार दिवस धोक्याचे, हवामान विभागानं दिला अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
आज 19 मे रोजीही विदर्भातील हवामान अस्थिर राहणार असून, वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या आसपास राहणार असून, आकाश ढगाळ होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
हवामान खात्याने नागरिकांना अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्यावर थांबू नये, झाडाखाली आसरा घेऊ नये तसेच विद्युत वाहिन्यांपासून दूर राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. पुढील चार दिवस विदर्भात असेच हवामान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहून हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.