Vidarbha Weather : विदर्भासाठी हवामान खात्याचा अलर्ट! 8 जिल्ह्यांत विजांचा कडकडाट, पाऊस आणि वादळ

Last Updated:
विदर्भात आज 10 मे रोजी सुद्धा काही भागांत पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातील 8 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
1/5
गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत पावसाचे वातावरण आहे. विदर्भासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुद्धा झालाय. विदर्भात आज 10 मे रोजी सुद्धा काही भागांत पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

advertisement
2/5
नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून, या जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

3/5
नागपूर आणि अमरावती येथे कमाल तापमान अनुक्रमे 39 आणि 40 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. या दोन्ही ठिकाणी ढगाळ वातावरण राहून, दुपारनंतर वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. चंद्रपूरमध्येही हवामान ढगाळ असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अकोला आणि वर्धा येथे अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

4/5
वर्धा आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होऊन हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामानातील या बदलामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. उघड्यावर ठेवलेले पीक उत्पादन आणि काढणी केलेले धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावे. शेतात काम करताना वादळ किंवा विजांचा आवाज ऐकू आल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी जावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

5/5
विदर्भात मे महिन्याच्या सुरवातीपासूनच पावसाचे वातावरण दिसून येत आहे. काही भागांत गारपीटसह पाऊस झाल्याने शेतीचे नुकसानही झाले आहे. पुढील काही दिवस आणखी पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. विदर्भातील 8 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement