विदर्भातील पारा घसरला, थंडीचा कडाका आणखी वाढणार, पाहा आजचं हवामान

Last Updated:
नाशिक आणि मराठवाड्यासह आता विदर्भातही थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. चंद्रपूरमधील किमान तापमानाचा पारा 17 अंश सेल्सिअस वर घसरलाय. 
1/5
राज्यात आता थंडीचा कडाका जाणवायला लागलाय. नाशिक आणि मराठवाड्यासह आता विदर्भातही थंडीचा जोर वाढतांना दिसून येत आहे. विदर्भात आता कोरडे हवामान असून ढगाळ वातावरण असल्याचे बघायला मिळत आहे.

advertisement
2/5
विदर्भात पुढील काही दिवस पावसाची कुठलीही शक्यता नाही. मात्र काही भागांत ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, बुलढाणा, वाशिम, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, गोंदिया या सर्व जिल्ह्यातील किमान तापमान हे 18 अंश सेल्सिअस ते 19 अंश सेल्सिअस इतके आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांमध्ये आता गुलाबी थंडी जाणवत आहे.

3/5
 या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अंशतः ढगाळ आकाश राहणार आहे तर काही ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना गुलाबी थंडी जाणवत आहे. अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांतील किमान तापमानात सुद्धा आता घट झाल्याचे दिसून येत आहे.

4/5
 तेथील किमान तापमान हे 19 अंश सेल्सिअस इतके असून कमाल तापमान हे 33 अंश सेल्सिअस इतके आहे. त्यामुळे विदर्भातील सर्वच शहरांमध्ये आता गुलाबी थंडी जाणवायला सुरुवात होणार आहे. पहाटेच्या वेळी विदर्भातील तुरळक जिल्ह्यांमध्ये गुलाबी थंडी अनुभवायला मिळत आहे. गेले काही दिवस विदर्भात विचित्र स्थिती बघायला मिळाली.

5/5
आता सुद्धा काहीशी स्थिती कायम आहे. काही जिल्ह्यांमध्ये पहाटे थंडी, दुपारी उन्हाचे चटके, काही वेळातच ढगाळ वातावरण अशी स्थिती असल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे शेतकरी कंटाळले आहेत. सद्या शेतात कपाशी आणि तूर हे पिकं आहेत. ढगाळ वातावरण तूर पिकाला नुकसान पोहचवते, त्यामुळे आता तुरी पिकांत अळी पडण्यास सुरुवात झाली आहे. नेमकं करावं तरी काय? असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडलाय. शेतकऱ्यांनी वाढत्या थंडी मध्ये योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement