'ऑक्टोबर हिट'मुळे अंगाची काहिली, पाहा विदर्भातील तापमानाचं ताजं अपडेट

Last Updated:
परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने विदर्भात ऑक्टोबर हिटचे चटके जाणवू लागले आहेत. आजचं तापमान इथं पाहा.
1/7
मोसमी वारे माघारी फिरताच राज्यसह विदर्भातील तापमानात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. ‘ऑक्टोबर हीट’मुळे विदर्भवासीयांच्या अंगाची काहिली होत आहे.

advertisement
2/7
आज बुधवार 11 ऑक्टोबर रोजी विदर्भातील बुलढाणा येथे 36.6अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस उष्णतेच्या झळा कायम राहण्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे.

3/7
मोसमी वारे माघारी फिरताच राज्यात तापमान वाढीचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. राज्यात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या झळा अधिक जाणवत आहेत. मान्सून परतल्यामुळे वातावरण कोरडे होऊ लागले आहे. दिवसा चांगले ऊन पडत असून रात्री आकाश निरभ्र असल्याने वातावरणात गारवा जाणवत आहे.

4/7
विदर्भात मागील दोन दिवस सरासरी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस वर होते. मंगळवारी त्यात आणखी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर आज नागपुरातील कमाल तापमान 35.5 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21.4 अंश सेल्सिअस असल्याचे नोंदविण्यात आले आहे.

5/7
मान्सून मोसमात विदर्भातील पर्जन्यमापात केवळ दोनच टक्क्यांची तूट नोंदविण्यात आली असून ती सामान्य असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे बरेच नुकसान झाले आहे. यंदा ऑगस्ट महिन्यात दांडी मारून बसलेला पाऊस सप्टेंबरमध्ये दमदार बरसला.

6/7
यंदाच्या मोसमात अकोला व अमरावती जिल्ह्यातील पर्जन्यमानात अनुक्रमे 23 व 27 टक्के तूट नोंदविण्यात आली. तर यवतमाळ येथे सर्वाधिक 14 टक्के अतिरिक्त पावसाची नोंद करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात यंदा 5 टक्के अतिरिक्त पर्जन्यमानाची नोंद करण्यात आली आहे.

7/7
नागपूर शहरात आज कमाल 35.5 तर किमान तापमान 21.4, गोंदिया कमाल 35.0 तर किमान 21.2, गडचिरोली कमाल 35.4 तर किमान 23.2, चंद्रपूर कमाल 35.4 तर किमान 23.4, यवतमाळ कमाल 36.0 तर किमान 19, वाशिम कमाल 35.2 तर किमान 19.4, बुलढाणा कमाल 36.6 तर किमान 21.2, अमरावती कमाल 35.6 तर किमान 21.5 अंश सेल्सिअस आहे. वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान 36.1 तर किमान तापमान 22.6 अंश सेल्सिअस आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement