हिवाळ्याच्या प्रतीक्षेत संपला निम्मा ऑक्टोबर, उन्हामुळे विदर्भवासी बेजार
- Published by:News18 Marathi
Last Updated:
सध्या ऑक्टोबर हिममुळे विदर्भातील लोक बेजार झाले आहेत. निम्मा ऑक्टोबर संपला तरी अजून थंडी सुरू झालेली नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तरी विदर्भातील चंद्रपूर, बुलढाणा, गोंदिया वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. गेल्या चार पाच दिवसापासून वातावरणात उष्मा असल्याने आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होत आहे. विदर्भात आणखी काही दिवस ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
advertisement
नागपूरचं नाही तर हा परिणाम संपूर्ण विदर्भात दिसून येत आहे. विदर्भाला देखील या उष्म्याने घाम फोडला आहे. नागपूर जिल्ह्यातील तापमान 35.0 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ अकोला 37.2अंश सेल्सिअस वर आहे. तापमान अचानक वाढले तर वातावरणात उष्मा वाढल्याने चांगलाच उकाडा निर्माण झाला आहे.
advertisement
नागपूर शहरात आज कमाल 35.0 तर किमान तापमान 20.2, गोंदिया कमाल 34.8 तर किमान 21.0, गडचिरोली कमाल 35.2 तर किमान 21.4, चंद्रपूर कमाल 34.8 तर किमान 22.2, यवतमाळ कमाल 35.5 तर किमान 20.5, वाशिम कमाल 36.2 तर किमान 18.6, बुलढाणा कमाल 34.6 तर किमान 20.6, अमरावती कमाल 36.4 तर किमान 20.3 अंश सेल्सिअस आहे. वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान 35.9 तर किमान तापमान 23.0 अंश सेल्सिअस आहे.