Vidarbha Weather Update: विदर्भात हुडहुडी, गोंदिया पारा 11 अंश सेल्सिअस, हवामान विभागाने दिला अलर्ट

Last Updated:
Vidarbha Weather Update: नवीन वर्षात विदर्भात थंडीचा जोर वाढलाय. 2 जानेवारीला विदर्भातील वातावरण कोरडे असणार आहे. ढगाळ वातावरण गायब होऊन मुख्यतः निरभ्र आकाश असल्याचे दिसून येत आहे.
1/5
गेल्या आठवड्यात राज्यातील वातावरणात अनेक चढउतार होताना दिसून आलेत. आता नवीन वर्षात सुद्धा राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहे. विदर्भात गेले कित्येक दिवस ढगाळ आकाश आणि धुके कायम होते. त्याचबरोबर थंडीचा जोरही कमी झाल्याचे दिसून आले. मात्र, आता नवीन वर्षात विदर्भातून ढगाळ वातावरण गायब झाले आहे. थंडीचा जोर ही वाढतांना दिसून येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील पारा 11 अंश सेल्सिअस पर्यंत आलाय.

advertisement
2/5
2 जानेवारीला विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ या तीन जिल्ह्यांमधील किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सर्व जिल्ह्यांमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. पुढील काही दिवस या जिल्ह्यातील किमान तापमान स्थिर असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

3/5
अमरावती, वर्धा या जिल्ह्यातील किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांत सुद्धा 2 जानेवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. अकोला, बुलढाणा या दोन जिल्ह्यातील किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके राहणार असून त्या ठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतील किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी घट झालेली दिसून येत आहे.

4/5
विदर्भातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद ही गोंदिया जिल्ह्यांत झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. गोंदियातील किमान तापमानात घट झाल्याने तेथील नागरिकांना गुलाबी थंडी जाणवणार आहे. गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यातील किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे.

5/5
वाशिम जिल्ह्यातील किमान तापमान हे 17 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यातील किमान तापमानात घट बघायला मिळाली. मात्र, वाशिम जिल्ह्यातील किमान तापमानात घट झालेली नाही. त्या ठिकाणचे किमान तापमान स्थिर असल्याचे बघायला मिळते. पुढील काही दिवस विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भात थंडीचा जोर कायम असणार आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement