विदर्भात थंडीची लाट, नागपुरात पारा 9 अंश सेल्सिअस, IMD नं दिला अलर्ट

Last Updated:
Vidarbha Weather Update: विदर्भातील किमान तापमानात सर्वाधिक घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विदर्भात आता थंडीचा कडाका वाढण्याची दाट शक्यता आहे. 
1/5
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील वातावरणात मोठे बदल घडून आलेत. राज्यात थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर विदर्भातील धुकं आणि ढगाळ आकाश सुद्धा गायब झालेत. आता विदर्भातील किमान तापमानात सर्वाधिक घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विदर्भात आता थंडीचा कडाका वाढण्याची दाट शक्यता आहे.

advertisement
2/5
3 जानेवारीला नागपूरमधील किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागपूर मधील किमान तापमानात सर्वाधिक घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागपूरकरांना थंडीचा कडाका सहन करावा लागण्याची शक्यता आहे. वर्धा, गोंदिया, बुलढाणा या तीन जिल्ह्यातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे.

3/5
विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाल्याने विदर्भात थंडीचा जोर वाढणार आहे. यवतमाळ मधील किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या सर्व जिल्ह्यातील किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे.

4/5
या सर्व जिल्ह्यांत 3 जानेवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. अकोला जिल्ह्यातील किमान तापमान 14 अंश सेल्सिअस तर वाशिम जिल्ह्यातील किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात विदर्भातील वातावरणात मोठे बदल घडून आलेत. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवस पासून विदर्भात थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे.

5/5
पुढील काही दिवसांत विदर्भातील किमान तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर कमी होणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सद्या विदर्भातील काही भागांत दुपारच्या वेळी उकाडा देखील जाणवत आहे. त्याचबरोबर थंडीचा जोर वाढीस लागलाय. सकाळी थंडी आणि दुपारी उकाडा जाणवत असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement