विदर्भातून पावसाची माघार, थंडीचा जोर आता वाढणार, पाहा हवामान अपडेट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
गेले काही दिवस या जिल्ह्यातील किमान तापमानात 4 ते 5 अंशांनी वाढ बघायला मिळत होती. आता हळूहळू विदर्भातील जिल्ह्यांत किमान तापमानात घट होत आहे. त्यामुळे विदर्भात थंडीचा जोर वाढणार आहे.
गेले काही दिवस फेंगल चक्रीवादळाचे सावट राज्यात होते. त्यामुळे राज्यातील विविध भागांत अनेक बदल घडून आलेत. थंडीचा जोर कमी होऊन अवकाळी पावसाचे संकट राज्यात बघायला मिळाले. आता राज्यात फेंगल चक्रीवादळाचा जोर ओसरलाय. राज्यातून पाऊस सुद्धा गायब झालाय. आता थंडीचा जोर वाढतांना दिसून येत आहे. विदर्भातही काहीशी अशीच स्थिती आहे. पावसाची शक्यता कमी होऊन विदर्भात थंडीचा जोर वाढणार आहे.
advertisement
9 डिसेंबरला विदर्भातील तुरळक जिल्ह्यांत धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे. तर काही जिल्ह्यांत धुके नसून फक्त अंशतः ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. विदर्भातील दोन जिल्ह्यांत 9 डिसेंबरला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम या जिल्ह्यातील किमान तापमान 9 डिसेंबरला 16 अंश सेल्सिअस इतके असणार आहे.
advertisement
गेले काही दिवस या जिल्ह्यातील किमान तापमानात 4 ते 5 अंशांनी वाढ बघायला मिळत होती. आता हळूहळू विदर्भातील जिल्ह्यांत किमान तापमानात घट होत आहे. त्यामुळे विदर्भात थंडीचा जोर वाढणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील किमान तापमान 17 अंश सेल्सिअस तर वर्धा, यवतमाळ या दोन जिल्ह्यातील किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असणार आहे.
advertisement
त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील किमान तापमान 14 अंश सेल्सिअस तर बुलढाणा जिल्ह्यातील किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर किमान तापमानात घट बघायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्यातील किमान तापमान 19 अंश सेल्सिअस तर गडचिरोली जिल्ह्यातील किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके असणार आहे.
advertisement
विदर्भात पुढील काही दिवसांत थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज 9 डिसेंबरला चंद्रपूरमधील किमान तापमानात सर्वाधिक घट नोंदवल्या गेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी गुलाबी थंडी जाणवायला लागेल. आधी अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि आता थंडीचा जोर म्हणजेच वातावरणात एकाएकी बदल घडून आल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.








