Vidarbha Weather : विदर्भात पुन्हा अवकाळी संकट, पुढचे 24 तास 7 जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आज 28 एप्रिल रोजी, काही जिल्ह्यांमध्ये ढग दाटण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे उन्हाच्या झळांमधून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
नागपूरमध्ये आज कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्याठिकाणी आज ढगांच्या गडगडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह दुपारनंतर काही भागांत पावसाच्या सरी पडू शकतात. नागपूरसह वर्धा, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement







