Vidarbha Alert: विदर्भावर दुहेरी संकट, पुढील 24 तास महत्त्वाचे, 3 जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला येलो अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
विदर्भात काही जिल्ह्यांतील तापमानात आणखी वाढ होऊन ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत आले आहे. त्याचबरोबर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होत असून, अनेक जिल्ह्यांतील कमाल तापमान 44 अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचले आहे. याच दरम्यान, आज 30 एप्रिलसाठी हवामान विभागाने नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली असून येलो अलर्ट सुद्धा जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील काही दिवस अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
advertisement
अमरावती, अकोला, वर्धा या तिन्ही जिल्ह्यांतील कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 ते 27 अंश सेल्सिअस दरम्यान असण्याची शक्यता आहे. अमरावती आणि अकोला या ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकत. तर वर्धेत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
चंद्रपूरमध्येही काहीशी अशीच स्थिती असून, तिथेही जोरदार वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. गोंदिया येथे संध्याकाळी किंवा रात्री पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर बुलढाण्यात अंशतः ढगाळ हवामान अनुभवायला मिळू शकतं. तापमान मात्र सर्वच जिल्ह्यांत 42 ते 44 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार आहे.
advertisement
या बदलत्या हवामानाचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर, आरोग्यावर आणि त्याचसोबत शेतीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. पाणी भरपूर प्यावे, शक्यतो घरात राहावे. विजांचा कडकडाट सुरू असताना मोबाइल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळावा, अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात येत आहेत.
advertisement
advertisement