वाह रे पठ्ठ्या... पारंपरिक शेतीला पर्याय; एका एकरात झेंडु फुलाच्या शेतीत लाखो रुपायांचा नफा

Last Updated:
बीड जिल्ह्यातील नित्रुड येथील ज्ञानेश्वर चव्हाण या तरुण शेतकऱ्याने झेंडू शेतीच्या माध्यमातून यशाची नवी गाथा रचली आहे. मागील तीन वर्षांपासून केवळ एक एकर क्षेत्रामध्ये झेंडूची लागवड करून तो प्रति हंगाम ३.५ ते ४ लाख रुपयांपर्यंत नफा कमावत आहे.
1/5
 बीड जिल्ह्यातील नित्रुड येथील ज्ञानेश्वर चव्हाण या तरुण शेतकऱ्याने झेंडू शेतीच्या माध्यमातून यशाची नवी गाथा रचली आहे. मागील तीन वर्षांपासून केवळ एक एकर क्षेत्रामध्ये झेंडूची लागवड करून तो प्रति हंगाम ३.५ ते ४ लाख रुपयांपर्यंत नफा कमावत आहे. पारंपरिक शेतीतून समाधान न मिळाल्यानंतर चव्हाण यांनी फुलशेतीचा मार्ग निवडला आणि त्याचाच फायदा त्यांना पहिल्याच वर्षी दिसून आला.

advertisement
2/5
 पत्रकार परिषदेत बोलताना ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले, “पूर्वी मी कापूस, ज्वारी आणि सोयाबीन हीच पिकं घेत होतो. पण खर्चाच्या तुलनेत मिळणारा उत्पन्नाचा फायदा अत्यंत मर्यादित होता. एका मित्राच्या सल्ल्याने मी झेंडू शेतीचा प्रयोग केला आणि पहिल्याच वर्षी तब्बल चार लाखांचा नफा मिळवला.”

3/5
 झेंडू लागवडीसाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ठिबक सिंचन प्रणाली, सेंद्रिय खतांचा वापर आणि नियमित व्यवस्थापनामुळे फुलांची गुणवत्ता उत्कृष्ट राहते. यामुळे मुंबई, पुणे, संभाजीनगर, लातूर, हैदराबाद आणि नागपूर येथील व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी येते.

4/5
 “मी माझा झेंडू थेट बांधावरून विकतो. व्यापारी थेट शेतावर येऊन खरेदी करतात. त्यामुळे बाजारात जाण्याचा वेळ आणि दलालांची कमिशन दोन्ही वाचतात,” असंही चव्हाण यांनी सांगितलं. या पद्धतीमुळे त्यांना थेट नफ्याचा मोठा फायदा मिळतो.

5/5
 ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या यशामुळे परिसरातील अनेक तरुण शेतकरी झेंडू शेतीकडे वळू लागले आहेत. पारंपरिक पिकांपेक्षा कमी जोखमीची आणि अधिक नफा देणारी झेंडू शेती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी नवी आशा निर्माण करत असल्याचं या परिषदेत उपस्थित कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement