महाबळेश्वर तापोळा-रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प, घटनास्थळाचे photos
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
महाबळेश्वरपासून काही किलोमीटर तापोळा रोडवर असलेल्या वाघिरा गाव येथील परिसरात दरड कोसळली आहे. डोंगरावरून मातीचा मलबा आणि मोठे दगड खाली आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. (शुभम बोडके/सातारा, प्रतिनिधी)
महाबळेश्वरपासून काही किलोमीटर तापोळा रोडवर असलेल्या वाघिरा गाव येथील परिसरात दरड कोसळली आहे. डोंगरावरून मातीचा मलबा आणि मोठे दगड खाली आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अशा डोंगरी भागातील रस्त्यांवर दरड कोसळणाऱ्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून पर्यटकांना करण्यात आले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दरम्यान, पावसामुळे पश्चिमेला भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. महाबळेश्वरमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभरात 89.7 मिमी असा पाऊस पडला आहे. त्यात आता महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळल्याने मोठी मोठी झाडे, मोठे दगड रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पर्यटकांना घाट रस्त्यातून जाताना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.