Thane Rain: ठाण्यात पावसाचा कहर, रस्त्यावर पाणी, भांडुपमध्ये 5 घरांसह कोसळली दरड, PHOTOS

Last Updated:
Thane Rain: ठाण्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. रस्त्यांवर पाणी साचले असून भांडुप भागात घरांसह दरड कोसळल्याची घटना घडलीये.
1/7
गेल्या आठवडाभरापासून मुंबईसह ठाणे परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसाचा डोंगराळ भाग आणि टेकड्यांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत.

advertisement
2/7
भांडुपच्या खिंडीपाडा भागात ओमेगा हायस्कूलच्या मागे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता घडलेल्या या घटनेत संरक्षक भिंतीसह 5 घरे 50 फुटांवरून खाली कोसळली आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे.

3/7
भांडुपच्या खिंडीपाडा भागात डोंगरावर रहिवाशी वस्ती आहे. याठिकाणी दिवसभर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे संध्याकाळी या भागातील पाच घरांसह दरड कोसळली. धोका लक्षात घेऊन ही घरे आधीच रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे जीवितहानी टळली.

4/7
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, महानगरपालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य पाहून परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.

5/7
ठाणे परिसरात पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.

6/7
मुंबईसह ठाण्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि वाऱ्याची गती वाढल्याने दृश्यमानता मोठ्या प्रमाणात खालावली आहे. रात्रीपासूनच पावसाचा जोर कायम असल्याने रस्ते जलमय झाले आहेत. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.

7/7
दरम्यान, पुढील काही दिवसांसाठी मुंबईसह ठाणे परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement