Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे समोर आले अन् एकनाथ शिंदेंनी गडबडले, नंतर सगळेच हसले PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
तीन वर्षांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत हातमिळवणी करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पहिल्यांदाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आले, पण साहजिकच यावेळी आता नेमकं करावं तरी काय, अशी अवस्था एकनाथ शिंदेंची झाली.
तीन वर्षांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत हातमिळवणी करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पहिल्यांदाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आले, पण साहजिकच यावेळी आता नेमकं करावं तरी काय, अशी अवस्था एकनाथ शिंदेंची झाली. चष्म्याला हात लावून शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नजरेला नजर भिडवण्याचं टाळलं, निमित्त होतं अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाचं. विशेष म्हणजे, या फोटो सेशननंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिलिंद नार्वेकर यांची पाठ थोपटून शाब्बासकी दिली.
advertisement
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधान परिषदेतून निवृत्त झाले आहेत. सभागृहात भाषणानंतर प्रथा परंपरेप्रमाणे निवृत्त सदस्य तसेच विरोधी पक्षनेत्यांसोबत फोटो काढतात. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, ज्येष्ठ मंत्री तथा विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते
advertisement
advertisement
उद्धव ठाकरे जसे समोर आले, त्यानंतर समोरच्या रांगेत उपमुख्यमंत्री अजित पवार, विधासनभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या बाजूला राम शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसलेले होते. उद्धव ठाकरे समोरून येताच सर्व नेते उभे राहिले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना राम शिंदेंच्या बाजूला बसण्याचा इशारा केला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement