अधिकमासात दर्शनासाठी भाविकांची शेगावच्या गजानन महाराज मंदिरात प्रचंड गर्दी, पाहा PHOTOS
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
रोज हजारो भक्त भारतातील कानाकोपऱ्यातून या क्षेत्री येतात आणि परम पावन समाधीचे दर्शन घेतात. सध्या सुरु असलेल्या अधिकमासात या ठिकाणी भक्तांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे.
advertisement
अधिक मास हा मल मास किंवा अपवित्र मास म्हणूनही ओळखला जातो. या मासामध्ये शुभ कार्य केले जात नाही आणि म्हणूनच लाखोंच्या संख्येने भक्त तीर्थस्थळाकडे धाव घेतात. तीर्थस्थळी जाऊन देवाचे दर्शन घेतल्याने आणि दानधर्म केल्याने विशेष पुण्य मिळते असं म्हणतात. त्यामुळे श्री संत गजानन महाराजांच्या शेगाव नगरीमध्ये मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे.
advertisement
सकाळपासून ते रात्री पर्यंत मंदिरात दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. गजानन महाराजांच्या मंदिरात असलेली कमालीची शांतता आणि स्वच्छता अनेकांना हवीहवीशी वाटते आणि भक्त या ठिकाणी आल्यानंतर बाहेर पडू इच्छित नाही. सध्याच्या अधिकमासात भजनी कीर्तनामुळे सायंकाळी अधिकच रम्य आणि भक्तिमय वातावरण आहे.
advertisement
शेगाव रेल्वे स्टेशन वरून मंदिर काहीच अंतरावर आहे रेल्वे स्टेशन ते गजानन महाराजांच्या मंदिरापर्यंत देवस्थानाच्या वतीनेच भक्तांच्या सेवेकरिता मोफत बस उपलब्ध आहेत. रेल्वे स्टेशन वर उभ्या असलेल्या देवस्थानाच्या बसमध्ये भक्त चढतात आणि या बसमधून मंदिरापर्यंत पोहोचतात. त्यानंतर फ्रेश होण्याची उत्तम व्यवस्थाही त्या ठिकाणी आहे.
advertisement
advertisement
advertisement


