Pension Schemes: ज्येष्ठ नागरिकांसाठी बेस्ट आहे ही स्किम, दरमहा मिळतील 9 हजार रुपये
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
ज्येष्ठ नागरिकांसाठी तसं पाहिलं तर अनेक योजना आहेत. मात्र आज आपण अशा एका योजनेविषयी जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये ज्येष्ठांना दरमहा 9 हजार रुपये मिळतात.
advertisement
advertisement
यात गुंतवणूक करून दरमहा पेन्शन मिळते. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा आणि नियमित उत्पन्न या दोन्ही गोष्टी मिळू शकतात. LIC च्या वतीनं ही योजना चालवली जाते. अनेक सरकारी, खासगी क्षेत्रातील तसेच बँकांनी पेन्शन योजना बंद केल्या असताना पंतप्रधान वय वंदना या योजनेची सुरूवात करण्यात आली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
वय वर्ष 60 किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. कमाल वयोमर्यादाची कुठलीही अट नाही. योजना पूर्ण होण्याचा कालावधी 10 वर्षे आहे. यात मासिक, तिमाही, सहामाही तसेच वार्षिक आधारावर पेन्शन दिली जाते. तुम्ही नोकरी करत असाल तर निवृत्तीनंतर ही योजना तुमच्या फायद्याची आहे. यातून दरमहा पेन्शन मिळेल.
advertisement
advertisement
यात ‘पीएमव्हीव्हीवाय’ यावर क्लिक करा व ऑनलाइन खरेदीचा ऑप्शन निवडून योजना घेता येऊ शकते. परंतु त्याआधी तुमची पूर्ण माहिती देण्याची आवश्यकता आहे. अर्जात सर्व माहिती भरल्यानंतर ‘पुढे जा’ या पर्यायावर क्लिक करून फॉर्म भरा. आवश्यक ती सर्व कागदपत्रं अपलोड करून ऑनलाइन फॉर्म जमा करता येऊ शकतो व पॉलिसी खरेदी करता येऊ शकते.