Cost, Price आणि Rate यांचा अर्थ एकच नाही, तुम्ही कोणताही शब्द कुठेही वापरत असाल तर थांबा आधी फरक समजून घ्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आपण अनेकदा एखाद्या दुकानात जातो तेव्हा एखाद्या वस्तूची किंमत जाणून घेण्यासाठी आपण मरराठीत त्याची किंमत किती असं विचारतो. पण इंग्रजीत विचारताना काही जण वस्तूची Cost, तर काहीजण Price आणि काही जण Rate विचारतात.
आपल्याला अनेकदा काही शब्द रोजच्या बोलण्यात इतके सहज ऐकू येतात की त्यांचा अर्थ आपल्याला माहीतच आहे असं वाटतं. पण जेव्हा त्यावर एखादा थोडा खोल प्रश्न विचारला जातो, तेव्हा आपणच गोंधळून जातो. असंच एक उदाहरण म्हणजे Cost, Price आणि Rate हे तीन शब्द. हे ऐकायला सारखेच वाटतात, पण प्रत्यक्षात त्यांचा अर्थ वेगळा असतो.
advertisement
advertisement
advertisement
Cost म्हणजे काय?‘Cost’ म्हणजेच लागत किंवा खर्च. एखादी वस्तू किंवा सेवा तयार करण्यासाठी लागणारा एकूण खर्च म्हणजे Cost. यात कच्चा माल, उत्पादन, कामगारांचा पगार, वितरण (Distribution) आणि इतर लागणारे खर्च यांचा समावेश होतो.उदाहरणार्थ : जर तुम्ही एक खुर्ची तयार करत असाल, तर लाकूड, रंग, कामगार, साधनं आणि वेळ हे सगळं एकत्र मिळून खुर्चीची Cost ठरते.
advertisement
Price म्हणजे काय?‘Price’ म्हणजे ग्राहकाने वस्तू किंवा सेवेसाठी दिलेली रक्कम. म्हणजेच ग्राहकाला एखादी वस्तू मिळवण्यासाठी मोजावी लागणारी किंमत.Price मध्ये वस्तू तयार करण्याची Cost आणि त्यावर लावलेला नफा (Profit Margin) या दोन्ही गोष्टींचा समावेश असतो.उदाहरणार्थ जर खुर्ची तयार करायला 800 रुपये लागत असतील आणि तुम्ही ती 1000 रुपयांना विकत असाल, तर त्या खुर्चीची Price = ₹1000 आहे.
advertisement
advertisement
advertisement


