शेअर बाजारात शांतता, 55 रुपयांचा शेअर 525 पर्यंत पोहोचला; त्यानंतर गुंतवणूकदारांना रडवले; 24 तासात 3,000 कोटी बुडाले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Stock Market: सलग तेजी आणि नवे उच्चांक गाठल्यानंतर Cupid लिमिटेडच्या शेअरमध्ये जोरदार नफावसूली दिसून आली असून, एका दिवसातच शेअर सुमारे 20 टक्क्यांनी कोसळला आहे. लाइफटाइम हायपासून 36 टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे.
advertisement
गेल्या काही सत्रांपासून चर्चेत असलेल्या Cupid च्या शेअरवर सोमवारी प्रचंड दबाव दिसून आला. शेअर 19.72 टक्क्यांनी घसरत 337.10 रुपयांवर बंद झाला. 1 डिसेंबर 2025 नंतरची ही सर्वात खालची पातळी असून, लाइफटाइम हायपासून पाहता शेअर आता सुमारे 36 टक्के खाली आला आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे जोरदार रॅलीनंतर गुंतवणूकदारांनी केलेली नफावसूली होय.
advertisement
खरंतर 2 जानेवारी रोजी Cupid चा शेअर 526.95 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. मात्र त्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलली. मागील सत्रात काही काळासाठी शेअर थेट 20 टक्क्यांच्या लोअर सर्किटपर्यंतही घसरला. ही पडझड अचानक नव्हती, कारण त्याआधी सलग 15 ट्रेडिंग सेशन्समध्ये शेअरने जोरदार चढ घेतला होता. कोणताही शेअर थांबा न घेता वर जात राहिला, की करेक्शनचा धोका वाढतो, हे बाजाराचं वास्तव पुन्हा समोर आलं.
advertisement
या तीव्र चढ-उतारांबाबत कंपनीकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. Cupid लिमिटेडने स्पष्ट केलं की शेअरच्या किमतीत झालेल्या मोठ्या हालचालीमागे कंपनीशी संबंधित कोणतीही संवेदनशील किंवा नकारात्मक माहिती नाही. म्हणजेच ही घसरण व्यवसायाशी जोडलेली नसून बाजारातील भावनांमुळे आणि गुंतवणूकदारांच्या वर्तनामुळे झाली आहे, असा कंपनीचा दावा आहे.
advertisement
advertisement
Globe Capital Markets चे टेक्निकल एक्सपर्ट विपिन कुमार यांच्या मते, Cupid च्या शेअरमध्ये आता चांगलाच करेक्शन झाला आहे. अवघ्या नऊ महिन्यांत शेअर 55 रुपयांवरून थेट 525 रुपयांपर्यंत पोहोचला होता, जो ओव्हर-स्ट्रेच्ड मूव्ह मानला जातो. त्यानंतर फक्त दोन ट्रेडिंग सेशन्समध्येच शेअर 526 रुपयांवरून 337 रुपयांपर्यंत घसरला.
advertisement
advertisement
advertisement
कंपनीचा ऑर्डर बुक सध्या विक्रमी पातळीवर असून, येत्या तिमाहींसाठी चांगली कामगिरी होण्याची शक्यता आहे. पालावा येथील मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये क्षमतेच्या विस्ताराचे काम नियोजनाप्रमाणे सुरू आहे. व्यवस्थापनाने FY26 साठी 335 कोटी रुपयांचा महसूल आणि 100 कोटी रुपयांचा निव्वळ नफ्याचा अंदाज पुन्हा एकदा कायम ठेवला आहे.
advertisement
Cupid च्या बाबतीत फंडामेंटल गोष्टी अजूनही मजबूत आहे. मात्र अल्पकालीन काळात शेअरची दिशा पूर्णपणे बाजारातील सेंटीमेंट आणि टेक्निकल घटकांवर अवलंबून आहे. वेगवान रॅलीनंतर करेक्शन येणं हा बाजाराचा स्वाभाविक नियम असल्याचं हे उदाहरण पुन्हा अधोरेखित करतं. उच्च पातळीवर खरेदी करणाऱ्यांसाठी संयम आणि योग्य रणनीती महत्त्वाची ठरेल, तर नव्या गुंतवणूकदारांसाठी थोडा थांबा घेणंच शहाणपणाचं ठरू शकतं.









