नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, 15 मार्चपर्यंत पूर्ण करा हे काम, नाहीतर होईल मोठं नुकसान
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
EPFO Update: जर तुम्ही या बातमीकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. EPFO ने आपल्या सदस्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
तुम्ही सरकारी किंवा खासगी कंपनी अथवा स्टार्टअपसाठी काम करत असाल आणि तुमच्या खात्यावर पगार येत असेल तुमच्या खात्यावरुन पीएफ कापला जात असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्ही या बातमीकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. EPFO ने आपल्या सदस्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
advertisement
एम्प्लॉयमेंट-लिंक्ड इंसेंटिव स्कीम (ELI) चा लाभ घ्यायचा असेल, तर UAN अॅक्टिव्ह करणे आणि बँक खात्याला आधारशी लिंक करणे गरजेचे आहे. यासाठी ही शेवटची संधी असून पुन्हा मदतवाढ मिळणार नाही. यासाठी आधीच दोनवेळा मुदतवाढ सरकारकडून देण्यात आली होती. 15 जानेवारी शेवटची तारीख होती ती वाढवून 15 फेब्रुवारी आणि आता मार्चपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
advertisement
आधार EPFO सोबत लिंक करण्याची आणि ELI चा लाभ घेण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी ही डेडलाइन 15 फेब्रुवारी 2025 होती, पण आता EPFO ने नोकरदारांना एक महिन्याचा अधिक अवधी दिला आहे. ज्यांनी अजूनही या दोन्ही गोष्टी केल्या नाहीत त्यांनी आताच करून घ्या नाहीतर नुकसान होऊ शकतं.
advertisement
ELI स्कीम म्हणजे काय: एम्प्लॉयमेंट-लिंक्ड इंसेंटिव (ELI) स्कीम ही सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली एक योजना आहे, ज्यामध्ये कर्मचार्यांना त्यांच्या नोकरीशी संबंधित विशेष प्रोत्साहन दिले जाते. वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलै 2024 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी EPFO च्या नियमांनुसार UAN सक्रिय करणे आणि बँक खाते आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे.
advertisement
UAN म्हणजे काय: UAN (Universal Account Number) हा एक 12 अंकी विशिष्ट क्रमांक आहे, जो प्रत्येक EPFO सदस्याला दिला जातो. हा क्रमांक कर्मचार्यांच्या सर्व PF खात्यांना एकत्र ठेवतो. म्हणजे, तुम्ही कितीही कंपन्यांमध्ये नोकरी केली असली तरी, तुमचा UAN एकच राहतो. यामुळे PF बॅलन्स तपासणे, पैसे ट्रान्सफर करणे किंवा काढणे सोपे होते.
advertisement
advertisement
EPFO सदस्यांसाठी ही शेवटची संधी आहे. केवळ काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे PF खाते व्यवस्थापित करू शकता आणि ELI स्कीमचा लाभ घेऊ शकता. हे काम वेळेत करून तुम्ही भविष्यातील आर्थिक नुकसान टाळू शकता. त्यामुळे अजूनही तुमच्या हातून वेळ गेला नाही. जर तुम्ही UAN अॅक्टिव्ह केला नसेल तर १५ मार्चपर्यंत तुमच्याकडे मुदत आहे.
advertisement