इथं दिवसाला 700 ते 800 ग्लास होतात खाली, लस्सीसाठी तर लागते रांग, बिझनेस करायचा तर पाहाच!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
जालना शहरामध्ये जय बजरंग मठ्ठा सेंटरवर दुपारी दोन वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत ग्राहकांची अक्षरशः रांग असते. शुद्ध दह्यापासून आणि त्यामध्ये वेगवेगळे मसाले घालून 15 रुपयाला एक ग्लास याप्रमाणे मठ्ठ्याची विक्री केली जाते.
advertisement
advertisement
advertisement
दुपारी दोन वाजता स्टॉल लागण्याची ग्राहक अक्षरशः वाट पाहत असतात. शुद्ध देशी दही त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, बुंदी घालून शाही मठ्ठा ग्राहकांना दिला जातो. त्याचबरोबर उत्तम गुणवत्तेची लस्सी देखील ग्राहकांना दिली जाते. काही मठ्ठा 15 रुपयांना ग्लास तर शाही लस्सी 30 रुपयांना ग्लास या पद्धतीने या दोन्ही थंडपेयांची विक्री केली जाते.
advertisement
advertisement
advertisement