GST: दसऱ्याला स्वस्तात घरी घेऊन या AC, TV आणि फ्रीज, GST च्या नव्या दरांचा किती होणार फायदा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
22 सप्टेंबरपासून GSTचे नवे दर लागू होणार आहेत, इलेक्ट्रॉनिक्स व रोजच्या वस्तूंवर GST कमी झाल्याने दिवाळी दसऱ्याला ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
GST चे नवे दर 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. हे नवे दर लागू झाल्यानंतर अनेक इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. यंदाच्या दसरा दिवाळीला हात सोडून खरेदी करू शकता आणि तुम्ही नवीन गोष्टी घरी आणू शकता. देशातील सामान्य ग्राहकांना दिवाळी, दसरा मोठ्या सणांच्या आधी मोदी सरकारने मोठी दिलासा देणारी घोषणा केली. 22 सप्टेंबर पासून जीएसटीच्या नव्या दरांची अंमलबजावणी होणार असून यामुळे इलेक्ट्रॉनिक्स खरेदी स्वस्त होणार आहे.
इलेक्ट्रॉनिक्सवर फक्त 18 टक्के जीएसटी
आतापर्यंत टीव्ही, फ्रिज, एसीसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर 28 टक्के जीएसटी आकारला जात होता. पण आता हे दर कमी करण्यात आले असून 18 टक्के केले आहेत. म्हणजे 10 टक्क्यांची सूट मिळाल्यामुळे ग्राहकांना 500 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंतची बचत होणार आहे.
घरगुती वस्तूंच्या मोठ्या यादीवर फायदा
या निर्णयाचा फायदा टीव्ही, एसी, कूलर, पंखा, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, सिलाई मशीन, व्हॅक्यूम क्लिनर, मायक्रोवेव ओव्हन, मिक्सर, जूसर, इंडक्शन कुकर, हीटर, हेअर ड्रायर, इलेक्ट्रिक शेवर, ट्रिमर, इस्त्री यांसारख्या उत्पादनांवर होणार आहे. फक्त इलेक्ट्रॉनिक्सच नव्हे तर साबण, डिटर्जंट, टूथपेस्ट, हेअर ऑइलसारख्या रोजच्या वापरातील 99 टक्के वस्तूंवरही जीएसटी कमी करण्यात आला आहे. या वस्तूंवर आता 12 टक्क्यांऐवजी फक्त 5 टक्के जीएसटी लागू होईल.
advertisement
जीएसटी स्लॅबमध्ये ऐतिहासिक बदल
जीएसटी काउन्सिलने मोठा निर्णय घेत 12 आणि 28 टक्क्यांचे स्लॅब पूर्णपणे रद्द केले आहेत. 22 सप्टेंबरपासून फक्त दोनच स्लॅब लागू राहतील. 5 टक्के आणि 18 टक्के. याशिवाय लक्झरी आणि काही ठराविक प्रोडक्ट्ससाठी 40 टक्क्यांचा स्लॅब तयार करण्यात आला आहे. दिवाळी किंवा दसऱ्याला तुम्ही थेट घरात नवीन इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू घेऊन येऊ शकता. दिवाळीला चांगला सेल देखील असतो. त्यानिमित्ताने तुम्ही घरातील जुन्या वस्तू रिप्लेस देखील करू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 11:36 AM IST
मराठी बातम्या/मनी/
GST: दसऱ्याला स्वस्तात घरी घेऊन या AC, TV आणि फ्रीज, GST च्या नव्या दरांचा किती होणार फायदा