Thane Traffic: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठा निर्णय, ठाण्यात सकाळी 6 ते रात्री 12 या वाहनांना ‘नो एन्ट्री’
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Thane Traffic: वर्दळीच्या काळातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे शहरातील वाहतुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत काही वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
ठाणे: ऐन वर्दळीच्या काळात शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी 6 ते रात्री 12 दरम्यान ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार ठाणे शहर वाहतूक शाखेने अधिसूचना लागू केली आहे. त्यामुळे 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या काळात हे आदेश लागू असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.
ठाणे शहरात अवजड वाहनांमुळे आणि गर्दीमुळे वर्दळीच्या काळात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे ठाणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. प्रमुख मार्गांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी अधिसूचना लागू करण्यात आली असून सकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंद असणार आहे.
advertisement
कशी असेल व्यवस्था?
ठाणे शहरात येणाऱ्या 10 आणि त्यापेक्षा जास्त चाकी अवजड वाहनांना पुढील मार्गावर प्रवेश बंद असेल.
मुंबई, नवी मुंबईकडून आनंद नगर चेक नाका मार्गे ठाणे शहरात येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना आनंद नगर चेक नाका येथेच प्रवेश बंद राहणार आहे.
advertisement
गुजरातहून घोडबंदर रोडच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद राहील.
मुंबई, विरार वसईहून घोडबंदर रोडच्या दिशेने येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना फाऊंटन हॉटेलजवळ प्रवेश बंद राहणार आहे.
बेलापूर-ठाणे रोडने विटावा जकात नाका मार्गे कळव्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना नवी मुंबईतील पटणी चौक येथून प्रवेश बंद राहील.
पनवेल- ठाणे मार्गावर रेतीबंदर पुढे पारसिक सर्कल येथे डावे वळण घेऊन कळव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना पारसिक सर्कलला प्रवेश बंद असेल.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 18, 2025 12:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Thane Traffic: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठा निर्णय, ठाण्यात सकाळी 6 ते रात्री 12 या वाहनांना ‘नो एन्ट्री’