पुन्हा होणार का नोटबंदी? ATM मधून काढता येणार नाहीत 500 च्या नोटा, का होतेय चर्चा आणि खरं काय?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
खिशात ५०० च्या नोटा आहेत? मग ही बातमी वाचाच! मार्च २०२६ पासून खरंच होणार का नवी नोटबंदी? सोशल मीडियावरील 'त्या' मेसेजचं सत्य आलं समोर; वाचा सरकार काय म्हणतंय...
८ नोव्हेंबर २०१६ ची ती थंडीची रात्र आजही अंगावर काटा आणणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली आणि बघता बघता संपूर्ण देशाचा वेग मंदावला. स्वतःच्याच कष्टाच्या पैशांसाठी लोक बँकांच्या रांगेत उभे असलेले चित्र आपण सर्वांनी पाहिले आहे.
advertisement
advertisement
advertisement
या बातमीमुळे अशा लोकांची झोप उडाली आहे ज्यांचा रोख व्यवहारांवर जास्त भर असतो. छोटे व्यापारी, गृहिणी आणि ग्रामीण भागातील नागरिक पुन्हा २०१६ सारखी परिस्थिती ओढवेल की काय, या भीतीने ग्रासले आहेत. "खरोखरच मार्च २०२६ नंतर या नोटा केवळ कागदाचा तुकडा उरणार का?" असे प्रश्न विचारणारे फोन कॉल एकमेकांना केले जात आहेत.
advertisement
फॅक्ट-चेक एजन्सी 'प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो' (PIB)ने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. या दाव्याची सखोल चौकशी करुन हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं पीआयबीने सांगितलं. ५०० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा कोणताही विचार किंवा योजना नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही ५०० रुपयांची नोट पूर्णपणे सुरक्षित आहे असं सांगितलं आहे. लोकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि त्या पुढे फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन सरकारने केले आहे.
advertisement
५०० ची नोट ही 'लीगल टेंडर' असून ती नेहमीप्रमाणे बाजारात स्वीकारली जाईल. यापूर्वी जून २०२५ मध्येही अशाच प्रकारच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. तेव्हा हे प्रकरण संसदेपर्यंत पोहोचले होते. त्यावेळी अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सभागृहात अधिकृत निवेदन दिले होते की, सरकारचा ५०० ची नोट बंद करण्याचा कोणताही विचार नाही.










