वहिनीसाठी फिल्डिंग, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दबाव, सोलापुरातील मनसे पदाधिकाऱ्याचं हत्येचं कारण समोर, Inside Story
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
महानगर पालिका निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोलापूरात मनसेच्या पदाधिकाऱ्यची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली.
महानगर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल (शुक्रवार, २ जानेवारी) शेवटचा दिवस होता. राज्यभरात अनेक ठिकाणी हायहोल्टेज ड्रामे बघायला मिळाली. काही ठिकाणी उमेदवारांना डांबल्याच्या घटना देखील घडल्या. सोलापुरात देखील निवडणुकीला गालबोट लागलं. इथं राजकीय वैमनस्यातून मनसेच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. धारदार शस्त्राने वार करत दिवसाढवळ्या त्यांची हत्या केल्याने सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
बाळासाहेब पांडुरंग सरवदे (३५, रा. जोशी गल्ली) असं हत्या झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. ते मनसे विद्यार्थीसेनेचे शहराध्यक्ष होते. शुक्रवारी सायंकाळी रविवार पेठेतील जोशी गल्लीत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. आता ही हत्या का झाली? यामागे काय राजकीय वाद होता? याची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.
advertisement
मनसेचे शहराध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी सांगितलं, सोलापुरचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचा मुलगा डॉ. किरण देशमुख यांचा प्रभाग बिनविरोध करण्यासाठी दबावतंत्र वापरण्यात येत होतं. त्यामुळे सोलापुरात सकाळपासून राजकीय हालचाली घडत होत्या. डॉ. किरण देशमुख यांचं पॅनल असलेल्या प्रभाग क्रमांक २ ब मधून उमेदवारी मिळवण्यासाठी बाळासाहेब सरवदे आणि शंकर शिंदे गटाने जोरदार ताकद लावली होती. मात्र, भाजपने शंकर शिंदे गटातील शालन शिंदे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. तिथे मृत बाळासाहेब यांच्या चुलत भावाची पत्नी रेखा सरवदे यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली होती. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही.
advertisement
उमेदवारी नाकारल्याने सरवदे गट आक्रमक
उमेदवारी नाकारल्याच्या रागातून सरवदे गटाच्या कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक शंकर शिंदे यांच्या संपर्क कार्यालयावर हल्ला केला. काही सामानाची तोडफोड देखील केल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर शंकर शिंदे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. ते तोडफोडीचा जाब विचारण्यासाठी बाळासाहेब सरवदे यांच्याकडे गेले. यावेळी बाचाबाची झाल्यानंतर वाद विकोपाला गेला. यावेळी त्यांच्यावर धारदार चाकुने वार करण्यात आला. छातीच्या खाली पोटाजवळ सहा ते आठ इंच खोल जबरी वार झाल्याने बाळासाहेब सरवदे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 9:01 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वहिनीसाठी फिल्डिंग, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दबाव, सोलापुरातील मनसे पदाधिकाऱ्याचं हत्येचं कारण समोर, Inside Story










