Mumbai Local : पहिल्यांदाच वापरताय Rail Oneॲप? फक्त 5 मिनिटांत काढता येणार लोकल पास; झटपट जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया
Last Updated:
Rail One App : रेल वन ॲपमुळे मुंबई लोकलचा पास काढणे आता अधिक सोपे झाले आहे. चला तर जाणून घेऊयात कशा प्रकारने प्रवाशांना यावरुन लोकलचे तिकीट किंवा पास काढता येईल.
advertisement
advertisement
सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये Google Play Store किंवा Apple App Store उघडा आणि तिथे Rail One हे अधिकृत ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड झाल्यानंतर ते ओपन करा. सुरुवातीला तुम्हाला नवीन खाते तयार करण्याचा पर्याय दिसेल. येथे तुमचा मोबाईल नंबर, नाव आणि आवश्यक वैयक्तिक माहिती भरून नोंदणी करता येते. जर तुमच्याकडे आधीच UTS किंवा IRCTC खाते असेल तर त्या तुम्ही थेट लॉगिन करू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
यानंतर तुम्हाला पास कुठल्या स्टेशनपासून कुठल्या स्टेशनपर्यंत हवा आहे ते स्टेशन सिलेक्ट करावे लागेल. स्टेशन निवडल्यानंतर Proceed to Book या पर्यायावर क्लिक करा. पुढे ट्रेनचा प्रकार निवडण्याचा पर्याय येईल. यामध्ये साधी लोकल, एसी लोकल किंवा मेल,एक्सप्रेस असे पर्याय उपलब्ध असतात. त्यातील योग्य पर्याय निवडा.
advertisement
यानंतर पासचा कालावधी Monthly किंवा Quarterly निवडा आणि त्यासोबत फर्स्ट क्लास किंवा सेकंड क्लास यापैकी एक पर्याय निवडा. पुढील स्क्रीनवर तुमचे नाव, पत्ता आणि इतर तपशील दिसतील. हे सर्व तपशील नीट तपासल्यानंतर UPI, नेट बँकिंग किंवा R-Walletच्या माध्यमातून पेमेंट करा. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुमचा डिजिटल लोकल पास त्वरित ॲपमध्ये जनरेट होईल जो तुम्ही My Booking या सेक्शनमध्ये पाहू शकता







