Share Market: विजेच्या वाढत्या मागणीतून कमवा पैसे, या शेअर्समध्ये येणार तुफान तेजी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
येत्या काळात विजेची मागणी वाढणार आहे. मेट्रो, मोनो, विजेवर चालणाऱ्या ट्रेन आणि इलेक्ट्रिक बस, इतकंच नाही तर विजेचा वापरही ग्राहकांचा वाढत आहे. त्यामुळे वाढती मागणी लक्षात घेऊन तुम्ही यातून पैसे कमवू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
साधारण 2035 पासून, विजेच्या मागणीपैकी एक तृतीयांश मागणी फक्त ईव्ही आणि डेटा सेंटर्सकडून होईल. डेटा सेंटरची क्षमता वार्षिक 30 टक्के दराने वाढू शकते आणि ईव्हीची मागणीही वाढणार आहे. तज्ज्ञांच्या मते, वाढती मागणी, जुन्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण वाढणाऱ्या ऊर्जा स्त्रोतांकडे वळणे यामुळे ऊर्जा क्षेत्रात 40 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याची संधी आहे.
advertisement
advertisement
पावर ग्रीड, जेएसडब्लू एनर्जी, टाटा पावर, या तीन शेअर्समध्ये आगामी काळात मोठी कमाई गुंतवणूकदार करू शकतात. पुढच्या दीड वर्षात याचा ग्रोथ रेट 2.4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. NTPC ग्रीन एनर्जी कंपनी आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. IEX मध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर ती लाँग टर्मसाठी केल्यास फायदा होऊ शकतो.