Share Market vs Mutual Fund: शेअर मार्केट की म्युच्युअल फंड, पैसे कुठे गुंतवू, कोण देईल जास्त नफा?

Last Updated:
शेअर्स आणि म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे दोन लोकप्रिय पर्याय आहेत. शेअर्समध्ये जोखीम जास्त असते तर म्युच्युअल फंड कमी जोखीमपूर्ण मानले जातात. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
1/9
पैसे वाचवणे आणि गुंतवणूक करणे ही काळाची गरज बनली आहे. बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा जास्त परतावा मिळवण्यासाठी अनेक जण शेअर बाजाराकडे आकर्षित होतात. पण शेअर बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असतात ज्यामुळे गुंतवणूकदारांना संभ्रम निर्माण होतो.

advertisement
2/9
यातीलच दोन लोकप्रिय पर्याय म्हणजे शेअर्स आणि म्युच्युअल फंड. दोन्ही पर्यायांमध्ये जोखीम आणि नफ्याचे गणित वेगळे आहे. चला तर मग समजून घेऊया तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य ठेल. नेमकं काय गणित आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया

3/9
शेअर्स आणि म्युच्युअल फंड, फरक काय? : शेअर्स म्हणजे एखाद्या कंपनीतील मालकी हक्काचे छोटे छोटे भाग. तुम्ही जेव्हा शेअर्स खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे अंशभागीदार बनता. कंपनीचा नफा झाल्यास त्याचा लाभांश तुम्हाला मिळतो.

4/9
म्युच्युअल फंड हे असे गुंतवणूक साधन आहे जे अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करते आणि ते पैसे वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये, बाँडमध्ये आणि इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवते.

5/9
शेअर्समध्ये गुंतवणूक ही जोखीमपूर्ण मानली जाते. शेअर बाजार अस्थिर असतो आणि शेअर्सची किंमत कधीही चढू शकते किंवा उतरू शकते. यामुळे शेअर्समध्ये कमी कालावधीत मोठा नफा मिळण्याची शक्यता असते तसेच तोटा होण्याचीही शक्यता असते.

6/9
दुसरीकडे, म्युच्युअल फंड गुंतवणूक ही तुलनेने कमी जोखीमपूर्ण मानली जाते. कारण तुमचे पैसे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवले जातात. त्यामुळे एका कंपनीतील तोट्याची भरपाई दुसऱ्या कंपनीतील नफ्याने होते.

7/9
गुंतवणुकीचा कालावधी: कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर शेअर्स योग्य नाहीत. कारण यामध्ये जोखीम जास्त असते. जोखीम पत्करण्याची क्षमता असेल तरच यामध्ये पडा. तुमची जोखीम पत्करण्याची क्षमता जास्त असेल तर तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता.

8/9
बाजाराचे ज्ञान: शेअर बाजाराचे चांगले ज्ञान असेल तरच शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. अन्यथा म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे. तिथेही तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करणं गरजेचं आहे. शॉर्ट टर्मवर नफा मिळेलच याची शक्यता नाही.

9/9
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement