स्मॉलकॅप्सचं गेम ओवर? लार्जकॅपची काय स्थिती, 2030 पर्यंत कसा राहिल मार्केटचा मूड, एक्सपर्टनी थेट सांगितलं

Last Updated:
शेअर बाजारात गेल्या काही वर्षांत मोठी तेजी पाहायला मिळाली. पण आता ही तेजी संपली आहे का? प्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ शंकर शर्मा यांनी मनीकंट्रोल ग्लोबल वेल्थ समिट 2025 मध्ये मोठं भाकीत केलं आहे. त्यांनी सांगितलं की, निफ्टी 50 पुढील 4-5 वर्षे मोठे परतावे देणार नाही आणि बाजार दीर्घकाळासाठी मंदीत राहू शकतो.
1/7
मुंबई:  गेल्या काही वर्षांत स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्सनी मल्टीबॅगर परतावे दिले, पण आता परिस्थिती बदलली आहे. बाजाराची ही घसरण तुमच्या गुंतवणुकीवर कसा परिणाम करू शकते, हे जाणून घ्या.

advertisement
2/7
शंकर शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, शेअर बाजारात 5 वर्षांचं तेजीचं चक्र (Bull Run) असतं आणि सध्याचा तेजीचा काळ आता संपण्याच्या टप्प्यावर आहे. गेल्या 5 वर्षांत भारतीय शेअर बाजारात प्रचंड तेजी होती, पण आता बाजारात मंदीचं चक्र (Bear Market) सुरू होऊ शकतं.

3/7
शंकर शर्मा यांच्या म्हणण्यानुसार पुढील काही वर्षांत गुंतवणूकदारांना मोठे परतावे मिळण्याची शक्यता कमी आहे. स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण होऊ शकते, तर लार्जकॅप शेअर्स मंद गतीने वाढू शकतात.

4/7
स्मॉलकॅप गुंतवणूकदारांसाठी धोका- गेल्या 3-4 वर्षांत स्मॉलकॅप शेअर्सनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला. मात्र आता शंकर शर्मा यांच्या मते, मंदीच्या काळात सर्वाधिक दबाव स्मॉलकॅप शेअर्सवर येईल.

5/7
स्मॉलकॅप शेअर्समध्ये 50% किंवा त्याहून अधिक घसरण होण्याची शक्यता आहे. स्मॉलकॅप शेअर्समधील जोखीम जास्त असल्यामुळे या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. मिडकॅप शेअर्समध्ये प्रचंड अस्थिरता राहू शकते.

6/7
लार्जकॅप शेअर्स सुरक्षित पण वाढ मंद गतीन होणार आहे. लार्जकॅप शेअर्समध्ये मंदीचा मोठा धोका नसतो, पण त्यांची वाढही संथ असते. शंकर शर्मा यांच्या मते, लार्जकॅप शेअर्समध्ये २०३० पर्यंत कोणतेही मोठे परतावे अपेक्षित नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन दृष्टीकोन ठेऊन गुंतवणूक करावी. "लार्जकॅप शेअर्स गडगडणार नाहीत, पण ते पुढील काही वर्षे थांबलेले दिसतील." असे ते म्हणाले.

7/7
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement