1 Litter Petrol Price in Iran : इराणमध्ये 1 लिटर पेट्रोलची किंमत किती? आकाडा तुम्हाला हादरवून सोडेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
what is 1 litter petrol price in iran : भारतात आधीच पेट्रोलच्या किमती शंभरीच्या आसपास असताना, आता या युद्धामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेषतः महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर आणि इराणमधील दर यांची तुलना केली, तर जमिन-अस्मानाचा फरक दिसून येतो.
सध्या मध्य आशियात इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे संपूर्ण जगाचे धाबे दणाणले आहेत. या युद्धाचा सर्वात मोठा आणि थेट परिणाम आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींवर होणार, याची शक्यता नाकारता येणार नाही. यामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होणार असल्याचं तज्ज्ञांकडून शक्यता वर्तवली जात आहे. याचे परिणाम आता थेट भारताला आणि पर्यायाने महाराष्ट्राला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
advertisement
advertisement
जागतिक बाजारपेठेत खळबळ आणि भारतावर परिणामइराण हा जगातील महत्त्वाचा तेल उत्पादक देश आहे. युद्धामुळे इराणमधून होणारा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात 'ब्रेंट क्रूड'चे दर वाढणार आहेत. भारत आपल्या गरजेच्या 80% पेक्षा जास्त तेल आयात करतो. त्यामुळे जर जागतिक दर वाढले, तर भारतातही पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणे अटळ आहे.इंधन महागल्यामुळे भारताच्या आयात बिलात वाढ होईल, ज्याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावर आणि देशातील महागाईवर होऊ शकतो.
advertisement
advertisement
advertisement
किमतीत एवढा प्रचंड फरक का? (The Real Reasons)महाराष्ट्र आणि इराणमधील दरात इतकी तफावत असण्यामागे मुख्यत्वे तीन कारणे आहेत:1. उत्पादक विरुद्ध आयातदार: इराण स्वतः तेलाचा अवाढव्य साठा असलेला देश आहे. त्यांना कच्च्या तेलासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही. याउलट, भारत बाहेरून तेल विकत घेतो, ज्यावर वाहतूक खर्च आणि विनिमय दर (Dollar rate) लागू होतात.
advertisement
2. सरकारी अनुदान (Subsidy): इराण सरकार आपल्या नागरिकांना जगातलं सर्वात जास्त इंधन अनुदान देतं. ते स्वतः तोटा सहन करून लोकांसाठी स्वस्त पेट्रोल उपलब्ध करून देतात. याउलट, भारतात अनुदानाऐवजी कर आकारला जातो.3. करांचे ओझे (Tax Structure): महाराष्ट्रात पेट्रोलच्या मूळ किमतीवर केंद्र सरकारचा 'एक्साईज ड्युटी' आणि महाराष्ट्र सरकारचा 'व्हॅट' (VAT) हे दोन्ही मोठ्या प्रमाणात आकारले जातात. एकूण किमतीच्या जवळपास 40-50% वाटा फक्त करांचा असतो, जो इराणमध्ये नगण्य आहे.
advertisement
advertisement







